Dnamarathi.com

Bathing Blood Pressure : आजच्या या बिझी लाईफस्टाईलमध्ये स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. जर आरोग्याकडे लक्ष दिलं नाही तर आपल्याला न कळत वेगवेगळ्या आजारांचा सामना आपल्याला करावा लागतो. त्यामुळे आजच्या काळात आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

तर दुसरीकडे गेल्या काही वर्षांपासून भारतात अनेकांना उच्च रक्तदाबाची समस्या होता आहे. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का?

चुकीच्या पद्धतीने आंघोळ केल्याने रक्तदाबावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे आंघोळीच्या पद्धतीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

आंघोळ करताना आपण अनेक चुका करतो, ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. बहुतेक लोक डोक्यावर पाणी ओतून आंघोळ करायला सुरुवात करतात. कारण बहुतेक लोकांना हे माहित नसते की त्यांनी शरीराच्या कोणत्या भागावर पाणी ओतून आंघोळ करायला सुरुवात करावी.

शरीराच्या कोणत्या भागावर प्रथम पाणी ओतावे?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आंघोळ करताना प्रथम पायांवर पाणी ओतले पाहिजे. पायांवर पाणी ओतल्याने शरीर हळूहळू तापमानातील बदल स्वीकारते आणि या परिस्थितीत हृदय आणि मेंदूला अचानक धक्का बसत नाही आणि रक्ताभिसरण संतुलित राहते.

पाणी ओतण्याचा योग्य क्रम जाणून घ्या

आंघोळ करण्यासाठी, प्रथम तुमच्या पायांवर पाणी घाला. यानंतर, घोट्यापासून गुडघ्यांपर्यंत आणि मांड्यांपर्यंत हळूहळू पाणी ओता. नंतर हातांवर आणि नंतर खांद्यावर पाणी ओता. शेवटी, डोक्यावर पाणी घाला.

या क्रमाने आंघोळ करण्याचा काय फायदा?

तज्ञांच्या मते, पायांवर प्रथम पाणी ओतल्याने शरीराला हळूहळू थंड तापमानाशी जुळवून घेण्यास वेळ मिळतो आणि रक्तवाहिन्या अचानक आकुंचन पावत नाहीत, ज्यामुळे रक्तदाब अचानक वाढण्याची शक्यता कमी होते. नंतर हळूहळू वरच्या दिशेने पाणी ओतल्याने रक्ताभिसरण सुरळीत राहते आणि शरीराचे तापमानही हळूहळू बदलते. अशा परिस्थितीत शरीरावर कमी दबाव असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *