Dnamarathi.com

PM Modi: अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील यांना १ लाख मतांची आघाडी देणार आहेत, त्या अनुषंगाने श्रीगोंदा मधून मतांची आघाडी देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांवर प्रचाराची धुरा असून श्रीगोंदाकरांची जबाबदारी वाढली आहे, 

असे सांगतानाच खासदार सुजय विखे पाटील यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे यांनी केले आहे.

नागवडे ताई यांनी पुढे बोलताना सांगितले कि, पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री आमचे नेते अजित पवार यांच्या राज्य सरकारने चांगले काम केले आहे, लोककल्याणकारी कार्य करत आहे. खासदार विखे यांनी लोकसभेचा सदस्य म्हणून लोकांना अपेक्षित विविध कामे केली आहेत, रस्त्यांचे अनेक प्रश्न खासदार सुजय विखे पाटील मार्गी लावले,

पुन्हा एकदा त्यांना मतदार संसदेत पाठवणार आहे पण मतांची आघाडी जास्त झाली पाहिजे यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यावर जबाबदारी आहे आणि ती पार पाडण्यासाठी श्रीगोंदा मतदारसंघात घरोघरी कमळ निशाणी पोहोचवा, असे सांगून सुजय विखे यांना प्रचंड मतांनी निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

मोदीजींनी केलेली कामे आणि जगाचा त्यांनी जिकंलेला विश्वास हि आपल्या देशासाठी जमेची बाजू आहे. मोदीजी पुन्हा पंतप्रधान होणार हा संपूर्ण जगाला विश्वास आहे. त्यामुळे जगातील अनेक दिग्गज उद्योग भारतात येण्यासाठी आतुर आहेत. यामुळे आपल्या देशाची ख्याती जगात उंचाविण्याचे काम यापुढेही होणार असून अबकी बार ४०० सौ पार होणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *