Dnamarathi.com

Ahmednagar News: शेवगाव तालुक्यातील रावतळे कुरूडगाव येथील युवा उद्योजक तथा शेअर मार्केट व्यावसायिक साईनाथ कल्याण कवडे यांना चाकूचा धाक दाखवून तू खूप ट्रेडिंग करून लोकांकडून पैसा गोळा केला आहे आम्हाला दर महिन्याला सात लाख रुपये हप्ता दे नाहीतर तुझा मर्डर करून तुला व तुझ्या कुटुंबाला संपवून टाकू आमच्या नादी लागू नको आम्ही फार मोठे गुन्हेगार आहोत.

 तुझ्या विरोधात सर्व कार्यालयात अर्ज करून तुझी बदनामी करून तुला सळो की पळो करून सोडू असे म्हणत खंडणी मागणाऱ्या नेवासा तालुक्यातील महेश मच्छिंद्र जगताप (राहणार गेवराई, तालुका नेवासा) तसेच योगेश शिवाजी चावरे (राहणार नजीक चिंचोली, तालुका नेवासा) या दोन व्यक्ती विरोधात भारतीय दंड संहिता अंतर्गत कलम ३८७ नुसार शेवगाव पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 युवा उद्योजक तथा शेअर मार्केट व्यावसायिक साईनाथ कल्याण कवडे यांनी शेवगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी शेअर मार्केट ट्रेडिंग व शेती हा व्यवसाय करीत असून दि. २९ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी मी माझ्या नजीक बाभूळगाव शिवारातील पपईच्या बागेत काम करत असताना महेश मच्छिंद्र जगताप तसेच योगेश शिवाजी चावरे   हे दोघे माझ्याजवळ हातात चाकू घेऊन आले व मला चाकू दाखवून म्हणाले की तू खूप ट्रेडिंग करून लोकांकडून पैसा गोळा केला आहे तू खूप मोठा झाला आहे तू आम्हा दोघांना दर महिन्याला खंडणी स्वरूपात सात लाख रुपये हप्ता चालू कर तू जर आम्हाला हप्ता दिला नाही तर आम्ही तुला सळो की पळो करून सोडू व तुझ्या विरोधात सर्व कार्यालयात अर्ज करून तुझी बदनामी करून टाकू असे ते म्हटल्यावर मी त्यांना पैसे देण्यास नकार दिल्याने ते जाताना मला म्हणाले की आम्ही खूप मोठे गुन्हेगार आहोत आमच्या नादी लागू नको तुला केव्हाच संपवून टाकू असे म्हणून ते निघून गेले परंतु भीतीपोटी मी तक्रार दाखल केली नाही.

 त्यानंतर वरील दोघांनी शेवगाव पोलीस स्टेशन तसेच अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्यासह इतर ११ कार्यालयात माझ्या विरोधात अर्ज दिले तसेच दिल्यानंतर नंतर त्यांनी मला वेळोवेळी फोनवर तसेच व्हाट्सअप कॉल वरती पैशाची मागणी केली तसेच पैशाची वेळेत पूर्तता न केल्यास तुला व तुझ्या फॅमिलीला संपवणार तसेच तुझ्या विरोधात आणखीन खोटे अर्ज करणार तसेच तू आमच्या विरोधात कोठेही कंप्लेंट कर आम्ही सर्व पोलीस मॅनेज केले आहेत असे धमकीचे मेसेज व्हाट्सअप वरती दिले.

 तसेच पोलीस आमचे काहीच करू शकत नाही आमची एसपी ऑफिस पर्यंत सेटिंग आहे अशी देखील धमकी दिल्याने नेवासा तालुक्यातील दोन व्यक्ती विरोधात शेवगाव पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सदर गुन्ह्याचा पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *