Dnamarathi.com

Maharashtra News: अहमदनगर शहरातील प्रसिद्ध उद्योजक अनिल जोशी यांची काल नेवासा तालुक्यातील वडाळा भैरोबा येथील विभाग बैठकीत केंद्रीय संघटन मंत्री मिलिंद परांडे यांच्या उपस्थिती विश्व हिंदू परिषदेच्या जिल्हा मंत्री पदी निवड करण्यात आली.

या वेळी अनिरुद्ध (अण्णा) पंडित,सतीश अरगडे,सुनील खिस्ती, गजेंद्र सोनवणे,कुणाल भंडारी, श्रीकांत नंदापुरकर आदी उपस्थित होते .

अनिल जोशी यांचे वडील सैन्यात कार्यरत होते. त्यामुळे त्यांचे शिक्षण नगरमध्ये झाले. पहिली ते दुसरी पर्यंतचे शिक्षण नगर शहरातील मध्यवर्ती शाळेत झाले. शिक्षण पूर्ण झाल्या नंतर नौदलात निवड झाली आणि पंधरा वर्षे नौदलात सेवा केली.

2000 मध्ये नौदलातून निवृत्त झाल्यानंतर 2007 पर्यंत परदेशात काम केले. त्यानंतर भारतात परत येऊन राष्ट्रिय स्वयंसेवक संघाच्या आदर्शांनी प्रभावित होऊन संघाच्या संपर्कात आले आणि संघात काम करू लागले.

 संघाच्या अखिल भारतीय पूर्वसैनिक सेवा परिषद चे ते सदस्य असल्याने त्यांची संघाच्या अखिल भारतीय पूर्वसैनिक परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *