Anagar Nagar Panchayat : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात चर्चेत असणारी अनगर नगरपंचायत आता बिनविरोध झाली आहे. मात्र राजकारण काही थांबताना दिसत नाही. अजित पवारांना चॅलेंज करावं, एवढी बाळराजेची लायकी नाही अशी टीका उमेश पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, सोलापूर यांनी केली आहे.
अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्यानंतर माजी आमदार राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांनी जल्लोष साजरा करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान दिला होता मात्र त्यानंतर जाहीर माफी देखील मागितली होती. तर आता या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हाध्यक उमेश पाटील यांनी बाळराजे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
माध्यमांशी बोलताना उमेश पाटील म्हणाले की, अजित पवारांना चॅलेंज करावं याची एवढी लायकी नाही, सार्वजनिक जीवनात निवडणुकीच्या माध्यमातून चॅलेंज करायचं असतं त्यामुळे निवडणुका आल्यानंतर चॅलेंज कर आता अशा पोकळ चॅलेंज करू नका.
अनगर नगरपंचायत बिनविरोध झाली म्हणून बाळराजे पाटील नाचतोय मात्र ही नगरपंचायत कोणी दिली..?
त्यावेळेस अनगर ग्रामपंचायतीची नगरपंचायत करा, अशा पद्धतीची मागणी करण्यासाठी अजित पवारांकडे बाळराजे गेला होता. ज्या वेळेला यांच्या बँकेकडे पैसे नव्हते, त्यावेळेला अजित पवार यांच्याकडे राजन पाटील आणि बाळराजे पाटील हे भीक मागत गेले होते अशी टीका उमेश पाटील यांनी केली.
तर दुसरीकडे आज अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे अर्ज माघार घेणार आहे.
अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे अर्ज माघार घेणार आहे.
राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्वला थिटे होत्या. मात्र त्यांच्या अर्जावर सूचकाची सही नव्हती त्यामुळे मी आक्षेप घेतला
त्याचबरोबर माझा अपक्ष उमेदवारी अर्ज वैध ठरला असला, तरी मी निवडणुकीतून माघार घेणार आहे
आम्ही राजन पाटलांचीच माणसं आहोत, त्यांच्या विचारानेच काम करतो. अर्ज माघारी घेणार आहोत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.






