Ahmednagar News: अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई कारवाई करत संगमनेर शहरात चैन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे.
20 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 3.00 च्या सुमारास फिर्यादी उषा अशोक लोंगानी त्यांचे नातवाला घराकडे घेऊन जात असतांना पाठीमागुन बाईकवर दोन आरोपींनी येवुन त्यांच्या गळ्यातील 32 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दोन तोळे वजनाचे गंठण तोडुन बळजबरीने चोरुन घेवुन पळुन गेले होते.
त्यांनतर त्यांनी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये भादविक 392, 34 प्रमाणे अनोळखी दोन आरोपी विरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणात पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानंतर दिनेश आहेर, स्था.गु.शा.अहमदनगर यांनी विशेष पथक नेमुण या प्रकरणात कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
या आदेशा प्रमाणे पोनि. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/मनोहर गोसावी, संतोष लोढे, पोना/रविंद्र कर्डीले, पोना/संदीप चव्हाण, गणेश भिंगारदे, संतोष खैरे, पोकॉ/रणजित जाधव, रोहित मिसाळ, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, चापोकॉ/अरुण मोरे पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुण गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
स्थागुशा पथकाने घटनाठिकाणी भेट देवुन घटनाठिकाणचे आजुबाजुचे सी.सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक करुन आरोपीची माहिती घेत असतांना सी.सी.टी.व्ही. फुटेजमधील संशयीत आरोपीचे नांव सचिन ताके रा. उंदीरगांव, ता. श्रीरामपुर असे असल्याचे निष्पन्न झाले.
पोनि दिनेश आहेर स्था.गु.शा. अहमदनगर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, या प्रकरणातील आरोपी त्याचा आणखी एक साथीदारासह अहमदनगर शहरातील चांदणी चौक परिसरात येत आहे. यानंतर या बातमीनुसार पोलीस पथकाने चांदनी चौक येथे सापळा लावला आणि एका आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.