Ahmednagar News: टिपु सुलतानच्या नावापुढे श्री नाव जोडल्याने हिंदुंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद तर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, 30 डिसेंबर 2023 महाराष्ट्र बॉडी बिल्डर मान्यतेने अहमदनगर डिस्ट्रीक्ट बॉडी बिल्डींग आयोजित टिपू सुलतान श्री शरीर सौष्ठ्य स्पर्धा भरवणारे सय्यद शहा फैजल (शानु), सोहेल शेख व सर्व आयोजकां विरोधात हिंदु धर्माचे आराध्य दैवत गणपती यांचे श्री हे नाव भारतावरती इस्मामिक राज्य आणण्याच्या हेतुने लाखों हिंदुंचे कतलेआम करणाऱ्या व हजारो हिंदु मंदिरे पाडणाऱ्या, हिंदू महिलांवरती बलात्कार करणाऱ्या टिपु सुलतान या इस्लामिक जिहादी आक्रमंताचे नाव जोडुन हिंदु धार्मियांची भावना दुखावुन तसेच रहदारीला अडथळा निर्माण करुन शहरातील पोलिसांच्या दप्तरी नोंद असलेले अति संवेदनशील आशा टॉकीज परिसर ज्या भागातुन कुठल्याही हिंदुंच्या मिरवणुक, मोर्चे काढण्यासाठी पोलिसांचे परवानगीसाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागते.
अशा ठिकाणी ही स्पर्धा भरवुन शहरामध्ये धार्मित तेढ निर्माण करण्याचे ठळक उद्देश दिसून येते.
यामधील सय्यद शहा फैजल (शानु) हा अनेक प्रकारच्या हिंदु मुस्लिम वादामध्ये आरोपी आहे. त्यामुळे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला हे कारस्थान करुन शहर व राज्यासह देशात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
त्यामुळे पोलिसांनी अतिशीघ्र संबंधीतांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत व हिंदुंच्या भावना दुखावल्या प्रकारणी कठोर स्वरुपाचे गुन्हे दाखल करावे.