Ahmednagar News: अहमदनगर शहरातील झेंडीगेट परिसरामध्ये कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई करत गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या 04 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून एकूण 20,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कोतवाली पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना झेंडीगेट परिसरात गोवंशीय जनावरांची कत्तल चालु असुन कत्तलीकरीता काही गौवंशीय जनावरे आणल्याची माहीती मिळाली होती.
मिळालेल्या माहितीवरून दराडे यांनी रात्रगस्त पेट्रोलिंगचे अधिकारी, अंमलदार यांना नमुद ठिकाणी पंचासह जावुन छापा टाकुन कारवाई करण्याचे आदेश दिले.
या आदेशावरून पोलिसांनी 02.15 च्या सुमारास छापा टाकुन कारवाई केली.
पोलीसांनी पंचासमक्ष तीन मालवाहु गाड्या, दोन लोखंडी सत्तुर, 12 गौवंशीय जनावरे व 3 म्हैसवर्गीय जनावरे, अंदाजे 600 किलो गोवंशीय जनावराचे मांस असा एकुन 20,55,000 रु किं.चा मुद्देमाल जप्त करुन ताब्यात घेतला.
या प्रकरणात पोलिसांनी 1) अरबाज खलील शेख, वय 23 वर्षे, रा. कोठला, अहमदनगर, 2) फैजल अस्लम शेख, वय 20 वर्षे, रा. बेपारी मोहल्ला, झेंडीगेट, अहमदनगर, 3) सलीम शब्बीर कुरेशी, 4) फैजान अब्दुल कुरेशी, रा. झेंडीगेट, अहमदनगर यांचेविरुध्द पो.कॉ. सुरज कदम यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये भा.दं.वि.कलम 269, महा. प्राणी रक्षा अधि सन 1995 चे सुधारीत सन 2015 चे कलम 5 (अ), 5 (क ), 9, 9(अ), तसेच प्राण्यांना क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध करणेबाबत अधि. 1960 चे कलम 11, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 119 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्ह्याचा तपास पोना/ए पी इनामदार हे करीत आहेत.