Dnamarathi.com

Loksabha Election 2024 : आगामी होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष महादेव जानकर यांच्या आदेशान्वये राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव रवींद्र कोठारी हे पक्षाची उमेदवारी करीत असल्याने अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील गावागावात सर्वसामान्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी संपर्क दौरे करून बैठका घेत आहेत. 

शेवगाव तालुक्याच्या मुंगी, बोधेगाव, कांबी, आखेगाव, वाघोली, देवी निमगाव, ताजनापुर आदींसह जिल्ह्यातील गावा-गावातील जनतेचा उत्तम प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळत आहे. संपर्क दौरा करून शेवगाव येथे पत्रकार परिषदेत रवींद्र कोठारी हे उमेदवारी करणार असल्याची घोषणा करून येत्या दिनांक 20 फेब्रुवारी रोजी अहमदनगर येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात बुथ प्रमुखांचा मेळावा व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

 यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव लेंडाळ, शेवगाव शहराध्यक्ष सुनील शिंदे, कर्जत शहराध्यक्ष प्रा. अमोल  क्षीरसागर, विनायक नजन सर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *