Ahmednagar News :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर तालुका पोलीस ठाण्याकडून अवैध हातभट्टी चालकावरती कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
नगर तालुका पोलीस स्टेशन ठाण्याच्या हद्दीतील साकत गाव व या परिसरात हातभट्टी दारू उत्पादन करून विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीवरून तत्काळ पथकासह स्वतः पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते साकत गावच्या शिवारातील 13/15 सुमारास छापा टाकून हातभट्टी चालक सोमनाथ नारायण पवार (राहणार साकत ताजी अहमदनगर) याच्या कब्जात 36000 किमती चा गावठी हातभट्टी तयार करण्याची कच्चे रसायनसह मुद्देमाल नष्ट करण्यात आला व सदर आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई)(फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसरी कारवाई साकत गावच्या शिवारात 14/30 छापा टाकला असता आरोपी हरिभाऊ मौला पवार (गाव-साकत खुर्द ता .जि.अहमदनगर) याच्या कब्जात 38 हजार रुपये किमतीचे हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले. सदर आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (फ) (क) (ड) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला
तिसरी कारवाई
साकत गावाच्या शिवारात सीना नदी पात्रात छापा टाकला असता आरोपी सोपान हरिभाऊ पवार (गाव- साकत खुर्द ता.जि. अहमदनगर) याच्या कब्जात 42 हजार रुपये किमतीचे हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले व सदर आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (फ )(क) (ड) (ई)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला
चौथी कारवाई साकत गावच्या शिवारात 16.30 पास्ता छापा टाकला असता आरोपी आकाश महिपती पवार (गाव,रा साकत ता, जि अहमदनगर) याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या कब्जात 46000 रू हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कच्चे रसायन व गावठी हातभट्टी तयार दारू साहित्य मिळून आल्याने ते नष्ट करण्यात आले सदर आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई)(फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर चार कारवाई मध्ये एकूण एक लाख 62 हजार किमतीचा मुद्देमाल नष्ट करून चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे करत आहेत.