Ahmednagar News: शेवगाव तालुक्यातील रावताळे कुरुडगाव ( भिमवाडी ) येथे सोमवार दि. १२ रोजी भारतीय बौद्ध महासभा अहमदनगर दक्षिण विभाग अंतर्गत तालुक्यातील श्रद्धावान उपासक, उपासिका, माजी श्रामनेर, बौद्धाचार्य यांच्या सहकार्याने महिला उपासिका शिबिर आयोजित करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रावताळे कुरुडगाव ग्राम शाखेचे अध्यक्ष सुधाकर निळ होते.
बैठकीमध्ये शिबिराच्या आयोजन संबंधी सविस्तर चर्चा झाली. भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अरुण भोंगळे यांनी शिबिरासंबंधी मार्गदर्शन केले. याप्रसंगी महासचिव बाळासाहेब गजभिव, बौद्धाचार्य तथा जिल्हा संघटक विजय हुसळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी बाळासाहेब नीळ, सिद्धार्थ सोनवणे, रवींद्र निळ, माजी श्रामनेर विनोद घाडगे, माजी श्रामनेर निवृत्ती नीळ, आजिनाथ निळ, रोहिदास निळ, प्रतीक नीळ, अलका निळ, आकांक्षा नीळ, वंदना नीळ इत्यादी श्रद्धावान उपासक-उपासिका या बैठकीसाठी उपस्थित होते.
तसेच येणाऱ्या दि. २८ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत शिबिराचे आयोजन करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. त्यासाठी परवानगी व केंद्रीय शिक्षिकेच्या मागणीचे पत्र जिल्हा शाखेकडे पाठविण्यात आले तसेच या शिबिराचा शेवगाव तालुक्यातील महिलांनी जास्तीत जास्त या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष तथा केंद्रीय शिक्षक अरुण भोंगळे यांनी केले आहे.