Ahilyanagar Winter Alert: राज्यातील अनेक भागात आता थंडीची सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी तापमान अचानक घसरल्याने नागरिकांचे हाल होताना दिसत आहे. तर दुसरीकडे यंदा अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वात जास्त थंडीची नोंद करण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिह्यात सध्या 10 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी तापमान नोंदवले जात असून येणाऱ्या काळात तीव्र थंडीच्या लाटेची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्तक रहावे असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
या गोष्टी लक्षात ठेवा:
पुरेसे उबदार कपडे वापरा (मफलर, कानटोपी, मोजे).
थंडीत शक्यतो घरातच थांबा आणि प्रवास टाळा.
शरीर उबदार ठेवण्यासाठी गरम पेये आणि व्हिटॅमिन-सी युक्त आहार घ्या.
वृद्ध, लहान मुले आणि पाळीव प्राणी यांची विशेष काळजी घ्या.
त्वचेचा रंग बदलणे, बधीर होणे यांसारखी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधा.
आपत्कालीन परिस्थितीत: नजिकचे आरोग्यकेंद्र किंवा 108 या क्रमांकावर संपर्क करावा.






