Ahilyanagar News: शेवगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत अफुच्या झाडाची बेकायदेशिररित्या लागवड करणाऱ्या आरोपीस अटक केली आहे. तसेच 11 लाख 43 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे. गणेश नवनाथ घोरतळे, (22 वर्षे रा. मारुती वस्ती बोधेगाव ता. शेवगाव) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
राज्यात लागवडीस बंदी घातलेले अफुच्या झाडाची बोधेगाव शिवारात गणेश नवनाथ घोरतळे याने त्याच्या शेतामध्ये बेकायदेशिररित्या लागवड केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
आरोपी विरोधात एन डी पी एस कायदा सन 1985 ते कलम 8(b), 18 प्रमाणे कायदेशिर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शेवगाव पोलिसांनी दिली आहे.