DNA मराठी

ABS System: जानेवारी 2026 पासून देशात उत्पादित होणाऱ्या सर्व दुचाकी वाहनांमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम म्हणजेच ABS सिस्टिम अनिवार्य करण्याच्या निर्णयाला मंजुरी मिळाली आहे. याच बरोबर नवीन दुचाकीसोबत दोन हेल्मेटही अनिवार्य करण्यात आले आहेत. ही ABS सिस्टिम नेमकी काय? याबद्दल जाणून घेऊया..

का घेण्यात आला निर्णय?

जानेवारी 2026 पासून, देशात उत्पादित होणाऱ्या सर्व दुचाकींमध्ये ABS अनिवार्य असेलरस्ते अपघात, त्यातून होणारे मृत्युला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

सध्या एबीएस 125 सीसी इंजिन क्षमता असलेल्या दुचाकींसाठीच सक्तीचे करण्यात आले आहे.

सध्या देशातील अंदाजे 40 टक्के दुचाकींना एबीएस सुरक्षा प्रणाली नाही पण, आता सर्वच प्रकारच्या इंजिन असलेल्या दुचाकींसाठी हे सक्तीचे करण्यात आलयं.

एबीएस काय आहे?

अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम एक सेफ्टी फीचर असून जे वाहनाच्या ब्रेक सिस्टममध्ये वापरले जाते. ABS बाईक किंवा कोणत्याही वाहनाला ब्रेक लावताना टायर लॉक होण्यापासून रोखते.

घसरण्याचा धोका होतो कमी

अचानक ब्रेक लावल्यानंतर वाहनांचे संतुलन बिघडते त्यामुळे वाहनावर नियंत्रण राहत नाही. हे टाळण्यासाठी आणि वाहन घसरून अपघात होऊ नये यासाठी एबीएस फायदेशीर ठरते. एबीएसमुळे ब्रेक लावल्यानंतरही चाकं लॉक न होता फिरत राहतात. तसेच रस्ता ओलसर किंवा घसरट असतानाही वाहनावर नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे वाहन अपघाग्रस्त होण्यापासून टाळते

ABS कसे काम करते?

ABS मध्ये काही विशिष्ट सेन्सर्स आणि इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट्स असतात जे टायर्सच्या वेगाचे सतत निरीक्षण करते. ब्रेक लावताच, सेन्सर्स टायरच्या वेगाचे निरीक्षण करते. जर, टायर अचानक लॉक होऊ लागला तर, ABS काही काळासाठी त्या टायरवरील ब्रेक प्रेशर कमी करते आणि बाईक संतुलित होताच, ही प्रणाली लगेच पुन्हा ब्रेक लावते.

ABS चे किती प्रकार आहेत?

सिंगल चॅनेल एबीएस: फक्त पुढच्या चाकावर काम करते

ड्युअल चॅनेल एबीएस : पुढच्या आणि मागच्या दोन्ही चाकांवर काम करते आणि हे अधिक सुरक्षित मानले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *