Thane News: ठाणे जिल्ह्यात नात्याला लाजवेल अशी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 10 वर्षांच्या मुलीवर बापाने बलात्कार केला.
पोलिसांनी सांगितले की, आरोपीने त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, आपले हे घृणास्पद कृत्य लपवण्यासाठी आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि मुलीचे अपहरण आणि सामूहिक बलात्काराची खोटी स्टोरी तयार केली.
आरोपीने सुरुवातीला पोलिसांना सांगितले की त्याच्या सावत्र अल्पवयीन मुलीचे 24 डिसेंबर रोजी तीन लोकांनी अपहरण केले होते. यानंतर भिवंडी तालुक्यातील एका गावात तिच्यावर बलात्कार झाला.
निवेदनाच्या आधारे, प्रथम पोलिसांनी मुलीचे अपहरण आणि बलात्कार प्रकरणी आयपीसी आणि पॉक्सो कायद्याच्या विविध कलमांतर्गत एफआयआर नोंदवला. पण तपासात पोलिसांना वडिलांची भूमिका संशयास्पद वाटली. पोलिसांनी आरोपीच्या जबानीत तफावत असल्याची चौकशी केली असता संपूर्ण सत्य बाहेर आले.
अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी पित्याने 10 वर्षांच्या मुलीवर त्याच्याच घरात बलात्कार केला होता, घटनेच्या वेळी मुलीची आई घरी नव्हती. आरोपीने पीडितेला खोटे सांगण्यास सांगितले होते. स्थानिक न्यायालयाने आरोपीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
नुकतेच नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात एका बापाने आपल्या 18 वर्षीय सावत्र मुलीवर बलात्कार केला. पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक करून तुरुंगात पाठवले आहे. ही बाब तेव्हा उघडकीस आली जेव्हा पीडितेने स्वतः पोलिस स्टेशन गाठून तिच्या सावत्र वडिलांविरोधात तक्रार दाखल केली.
मुलीने आपल्या जबानीत सांगितले की, आरोपीने 22 डिसेंबर रोजी तिच्यावर बलात्कार केला. ती घरी झोपली असताना आरोपीने हा गुन्हा केला. पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.