DNA मराठी

Cockroach Janata Party : भाजपला मागे टाकत, ‘कॉकरोच जनता पार्टी’ने इंटरनेटवर रचला इतिहास; 4 दिवसात 9 दशलक्ष फॉलोअर्स

cockroach janata party

Cockroach Janata Party : मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर Cockroach Janata Party (CJP) ची जोरदार चर्चा सुरू आहे. या पक्षाने आता सोशल मीडियावर भाजपला मागे टाकत नवीन इतिहास रचला आहे.

पक्षाने सोशल मीडिया मोहिमेने 90 लाखांहून अधिक (9 दशलक्ष) फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहे. इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या बाबतीत या मोहिमेने जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या ‘भारतीय जनता पक्ष’ (BJP) लाही मागे टाकले आहे.

अवघ्या चार दिवसांत भाजपला टाकले मागे

21 मे रोजीच्या आकडेवारीनुसार, भाजपच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर (@bjp4india) सुमारे 87 लाख (8.7 दशलक्ष) फॉलोअर्स होते तर केवळ चार दिवस जुन्या असलेल्या ‘Cockroach Janata Party’ ने 90 लाखांचा (9 दशलक्ष) टप्पा केव्हाच ओलांडला आहे. सध्या या यादीत काँग्रेस पक्षाचे हँडल (@incindia) अव्वल स्थानी असून त्याचे सुमारे 1.32 कोटी (13.2 दशलक्ष) फॉलोअर्स आहेत, तर ‘आम आदमी पक्षा’चे (AAP) सुमारे 19 लाख (1.9 दशलक्ष) फॉलोअर्स आहेत.

भाजपने आतापर्यंत 18000 हून अधिक पोस्ट शेअर केल्या आहेत तर CJP ने केवळ 54 पोस्ट्सच्या माध्यमातूनच हा टप्पा गाठला आहे. डिजिटल विश्वात, अलीकडच्या काळातील सर्वात मोठी राजकीय मोहीम म्हणून या CJP चे कौतुक केले जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी एका न्यायालयीन सुनावणीदरम्यान केलेल्या कथित वादग्रस्त टिप्पणीच्या विरोधात निषेध नोंदवण्यासाठी तरुणांनी ही मोहीम सुरू केली आहे. या सोशल मीडिया खात्याच्या ‘बायो’मध्ये (Bio) स्वतःचे वर्णन करताना असे म्हटले आहे की, हे “तरुणांचे, तरुणांनी चालवलेले आणि तरुणांसाठी असलेले एक राजकीय व्यासपीठ” आहे. हे व्यासपीठ केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून काम करत नाही तर देशातील तरुण वर्ग बेरोजगारी, प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटना (Paper leaks) आणि राजकीय उत्तरदायित्व यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर आपला संताप व्यक्त करण्यासाठी या माध्यमाचा वापर करत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *