DNA मराठी

Rohit Pawar on Ajit Pawar Death Case : अजितदादा अपघात प्रकरणात राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली कमिटी तयार करा; रोहित पवार असं का म्हणाले?

rohit pawar

Rohit Pawar on Ajit Pawar Death Case : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांचं झालेल्या अपघाती निधनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणात राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस आणि इतर पक्षातील नेत्यांना भेटणार असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली.

माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, दिल्लीत जाऊन काँग्रेस आणि इतर नेत्यांना भेटणार. अजित पवार यांचा घातपातच झाला असे आमचे म्हणणे आहे. एकनाथ शिंदे 2023 ला डावोसला जाताना विमान पाण्यात आले असते, त्यावेळी अपघात झाला असता, याच व्हिएसआर कंपनीचे विमान होते, इराण इराक ने हे वाटले असते तर विमान पाडले असते.

दादांच्या अपघातबाबत कायम लढत राहणार DGCA चे सस्टेटमेंट सीआयडीकडे आले नाही असे म्हणत आहेसीआयडी बाबत काही पद्धत चुकीची पद्धत आहे.

मराठी अधिकाऱ्याला अजित पवार यांच्या विमान अपघात तपास द्यावा, बिहार मध्ये सुशांत सिंग प्रकरणात तपासात अधिकारी बदलल्यानंतर लगेच तपास झाला होता, व्हि के सिंग बोलू नये यासाठी माहिती होते, व्हि के सिंग प्लॅनिंग सांगू शकतो,त्याला वाचवले जाते. अजित पवार अपघात प्रकरणी सुनेत्रा पवार आणि पार्थ पंतप्रधान यांना जाऊन परवा भेटणार असल्याची माहिती आहे. असं रोहित पवार म्हणाले.

माध्यमांशी बोलताना पुढे रोहित पवार म्हणाले की, अजित पवार अपघात प्रकरणी राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी झाली पाहिजे त्याचा तपास केला जाईल.

सगळ्याची वेगवेगळी स्टाईल असेल, काकी आणि पार्थ पदामुळे बोलत नाही, जय राजकरणात नसल्यामुळे बोलत आहे. आम्ही सत्तेत असतो आम्ही सत्तेला लाथ मारली असती असं देखील यावेळी रोहित पवार म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *