DNA मराठी

Ahilyanagar Crime: 4000 किलो मांगुर मासा जप्त; शिर्डीत पोलिसांची मोठी कारवाई

Ahilyanagar Crime: शिर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडुन प्रतिबंधीत 4000 किलो मांगुर मासा जप्त करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या कारवाईत तब्बल 29 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कारवाई करा असे आदेश सोमनाथ घार्गे जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना आदेश दिले होते. या आदेशावरून शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती घेत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे.

03 मार्च 2026 रोजी ट्रक नंबर WB25M5023ú केंद्र सरकारने प्रतिबंधीत केलेले मांगुर मासे भरुन नगर मनमाड हायवे रोडवरील निमगाव बायपास रोड चौक येथुन जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्याने पथकाने तात्काळ शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, पोउपनि/ सागर काळे व पोलीस अंमलदार यांना बोलावुन घेवुन निमगाव बायपास रोडवर सापळा रचुन ट्रक ताब्यात घेतला.

या प्रकरणी स्वपन नियम डे , मकबुल रौफ सरदार कुतुब आयुब मंडल आणि मृत्युंजय मुकुल विश्वासला अटक केली आहे. चारही आरोपी पश्चिम बंगाल येथे राहणारे असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांकडुन 4,00,000 रुपये किमतीचे 400 किलो प्रतिबंधीत मांगुर मासे व 25,00,000 रुपये किमतीचा ट्रक असा एकुण 29,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन प्रतिबंधीत मासे कायदेशीर प्रक्रिया करुन नाश करण्यात आले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *