Dnamarathi.com

Madhi Devasthan : आज श्री क्षेत्र मढी देवस्थानच्या विश्वस्तांमध्ये अध्यक्ष बदलाच्या मुद्द्यावरून जबरदस्त राडा झाला. 

 समोर आलेल्या माहितीनुसार अध्यक्ष बदलासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीदरम्यान विश्वस्तांमध्ये हाणामारी झाली.  या घटनेमध्ये अध्यक्ष संजय मरकड यांना जबरदस्त मारहाण झाली. त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले आहे.

श्रीक्षेत्र मढी देवस्थानच्या अध्यक्षपदावरून दोन गटात मागील काही दिवसांपासून धूसफूस सुरू होती. यामुळे आज गुरुवार दि. 14 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजेच्या दरम्यान देवस्थानच्या सभागृहामध्ये विश्वस्तांच्या बैठक ठेवण्यात आली होती. या बैठकीत बहुमताने अध्यक्ष बदलाबाबत निर्णय घेण्यात येणार होता.

अध्यक्ष बदलाची चर्चा सुरू असतानाच तेथे दोन गटात राडा झाला. विश्वस्तांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक सुरू झाली असताना काही स्थानिक युवक पडले. अखेर या शाब्दिक चकमकीचे रुपांतर लाठ्या-काठ्यांनी हाणामारी झाले. 

दोन गटात सुरू झालेल्या हाणामारीने उपस्थितांमध्ये चांगलीच धांदल उडाली. दोन्ही गटाने एकमेकांना मारहाण केल्याने काहीजण जखमी झाले.

या सर्व जखमींना उपचारासाठी पाथर्डी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी पाथर्डी ग्रामीण

रुग्णालय व पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठी गर्दी झाली होती. 

जखमींवर उपचार सुरू असून पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *