Dnamarathi.com

Gutkha Ban – दोन महिन्यापूर्वी अहमदनगर शहरामध्ये दारूबंदी चळवळीचे कार्यकर्ते  हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता.

 कुलकर्णी ज्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत त्या शाळेच्या आजूबाजूला असलेल्या गुटखा आणि अवैध्य व्यवसायाच्या विरोधात त्यांनी महापालिका आणि पोलीस प्रशासनाला पत्र देऊन कारवाईची मागणी केली होती. 

हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा देखील उपस्थित झाला मात्र नगर जिल्ह्यातील परिस्थिती काही बदलली नाही, यामुळे राज्यातील गुटखा बंदी हि फसलेली बंदी आहे. तसेच ही जी शासनाने गुटखाबंदी केली आहे. त्यामुळे गुटखा विक्री करण्याचे प्रमाणही वाढले असून यामध्ये पोलिसांचे हप्ते वाढले असा थेट आरोप सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केला आहे. 

शाळा व महाविद्यालय परिसरातील गुटखा, तंबाखू अशा अवैद्य टपऱ्या काढण्याची मागणी कुलकर्णी यांनी नगर जिल्हा प्रशासनाकडे केली होती. या कारणावरून हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची  घटना घडली होती. या घटनेला दोन महिने होऊन गेले व नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सुमारे 32 आमदारांनी या हल्ल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता व याबाबत शिक्षक  आमदार विक्रम काळे यांनी लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला आहे. 

मात्र या हल्ल्याच्या घटनेनंतरही अहमदनगर जिल्ह्यातील परिस्थिती बदलली नसून जिल्ह्यातील अवैद्य गुटखा विक्री आणि अवैध धंदे तसेच सुरू असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.सध्याची नगर जिल्ह्यातील परिस्थिती पाहता गुटखाबंदी ही फसलेली बंदी असल्याचे सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे. 

गुटखाबंदीने पोलिसांचे हप्ते वाढले…

ही जी शासनाने गुटखाबंदी केली आहे. त्यामुळे गुटखा विक्री करण्याचे प्रमाणही वाढले असून यामध्ये पोलिसांचे हप्ते वाढले असा थेट आरोप सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केला आहे. गुटखा हा शरीराला घातक असल्यामुळे तरुणांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. माझ्यावर हल्ला झाल्यानंतर प्रशासनामध्ये थोडी चलबीचाल झाली मात्र कुठल्याही प्रकारचं धोरणात्मक निर्णय किंवा ॲक्शन सरकारकडून होताना दिसत नाही असे खंतही त्यांनी व्यक्त केली. 

प्रशासनाचे सर्रास दुर्लक्ष

राज्यातील सर्वच भागात गुटखा आणि मावा खुलेआम विक्री जोरात सुरू आहे. मात्र अन्न औषध प्रशासन याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करत असून या मावा आणि गुटखा विक्री करणाऱ्या या महानगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून लावण्यात येत असताना महानगरपालिका ही याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही करत. 

संपूर्ण जिल्ह्यात याच प्रकारे सर्व अवैद्य धंदे सुरू असून प्रशासन याकडे दुर्लक्ष का करत आहे? हा प्रश्न हेरंब कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *