Ahilyanagar News: चार वर्षे चालत आलेल्या शेतरस्त्याच्या वादाला शेवटी तोडगा निघाला. महसूल विभाग, पोलिस प्रशासन व स्थानिक शेतकऱ्यांच्या समन्वयातून समुपदेशनाच्या माध्यमातून मार्ग काढत रस्ता खुला करण्यात आला.
तहसीलदारांच्या आदेशाची प्रक्रिया सुरू असतानाच मंडळाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने फेरपालटाने जमिनींची अचूक माहिती समोर आली, त्यातून वादी–प्रतिवादींमध्ये सामंजस्य घडून आले.
शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने झाडी-झुडपे हटवण्याचा निर्णय घेतला आणि फक्त चार तासांत रस्ता खुला झाला. महसूल अधिकाऱ्यांनीही या सकारात्मक उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. एकजुटीने काम केल्यास कोणतेही आव्हान सोपे होते, याचे उत्तम उदाहरण.
चर्चेत सहभागी असणारे
भाऊसाहेब मतकर, विक्रम मतकर, नारायण मतकर, सुरेश मतकर, राजेश मतकर, वसंत मतकर, रेवजी कराळे, कमलाकर जाधव, संदीप जाधव, म्हातारदेव जाधव, आदिनाथ जाधव, हरिश्चंद्र मतकर, रमेश मतकर, जैनोद्दीन शेख, मन्सूर शेख, पोपटराव कराळे (संचालक, खरेदी-विक्री संघ) आदी






