DNA मराठी

Devendra Fadnavis: भारतीय संघातील महाराष्ट्रीयन खेळाडूंना रोख पारितोषिक देणार मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

devendra fadnavis

Devendra Fadnavis: भारतीय महिला संघाने शानदार कामगिरी करत महिला क्रिकेट विश्वचषकातील अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच आपलं नावं विश्वचषकावर कोरले. तर आता भारतीय महिला क्रिकेट संघाच्या या शानदार कामगिरीनंतर राज्य सरकारकडून या संघात सहभागी असणारे महाराष्ट्रीयन खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतीय महिला क्रिकेट संघाचं राज्यसरकारकडून अभिनंदन सत्कार करण्यात येणार आहे. याबाबत राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक देणार येणार आहे. स्मृती मंधाना, जेमिमा रॅाड्रिग्ज, राधा यादव यांचा सन्मान केला जाणार असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तर दुसरीकडे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्ह्यात आढळून आलेल्या बिबट्यासंदर्भात देखील प्रतिक्रिया दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बिबट्यासंदर्भातला रेस्क्यू सेंटरला देण्याची परवानगी मिळावी असे प्रयत्न केले जात आहे. पुण्यात बिबट्याच्या हल्ल्यात अनेकजणांचा मृत्यू झाला आहे.

पुणे, अहिल्यानगर भागात बिबट्यांची संख्या 1300 वर आहे. राज्यातील 21 प्रकल्पाचा काल मी आढावा घेतला आहे, ज्या प्रकल्पाची पुर्ण होण्याची जी नियोजित तारीख दिलेली आहे , ज्या प्रकल्पाची काम मागे पडली आहेत त्याच्या कंत्राटदारांना देखील बोलावलं होतं त्यांच्या त्यांनी अडचणी सांगतल्या, त्यांना तंबी दिलेली आहे. तसेच प्रोजेक्ट वेळेत पुर्ण झाले पाहिजे या दृष्टीने सुचना दिलेल्या आहे अशी माहिती यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *