DNA मराठी

ST Co-operative Bank : एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मीटिंगमध्ये तुफान राडा… फ्री स्टाईल मारामारी नंतर पोलीस केस

st co operative bank

ST Co-operative Bank : एसटी को-ऑपरेटिव बँक ही एसटी कर्मचाऱ्यांच्या घामाच्या पैशावर चालणारी आशिया खंडातील सगळ्यात मोठी को-ऑपरेटिव्ह बँक म्हणून ओळखली जात होती. परंतु सध्या ह्या बँके बाबत नेहमीच काही ना काही विचित्र ऐकायला येते. भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेले संचालक मंडळ कामगारांच्या मेहनतीच्या पैशांवर मौज करत आहे. याचे अनेक उदाहरणे आजवर आपण बघितलेत.

आज एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची मीटिंग घेण्यात आली.त्यात अडसूळ गटातील संचालकांनी सदावर्ते गटातील संचालकांनी बँकेत चालवलेला भ्रष्टाचार बाहेर काढल्याने या मीटिंगमध्ये अक्षरशा फ्रीस्टाइल मारामारी बघायला मिळाली. संचालक मंडळाच्या सदावर्ते गटाने अक्षरशः बाहेरून बाया बोलवून त्यांच्या हातून संचालक मंडळाच्या अडसूळ गटाला तुफान मारहाण केली, शिव्यांचा अक्षरशः पाऊसच पडला,कपडे फाडले,लाथा बुक्क्यांनी तुडवले. संचालकांचा हा राडा आता पोलीस स्टेशन पर्यंत गेला असून पुढील कारवाई चालू आहे.

अशा संचालकांच्या हाती एसटी बँक देऊन एसटीचे सभासद आता पश्चाताप करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *