Shahrukh Khan : समीर वानखेडे यांची नेटफ्लिक्सच्या बॅड्स ऑफ बॉलिवूड वेबसिरीज विरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. नेटफ्लिक्स आणि शाहरुख खान यांच्या रेड चिलीस इंटरटेनमेंटच्या विरोधात समीर वानखेडे यांनी मानहानीचा खटला दाखल केला आहे.
बॅड्स ऑफ बॉलिवूड वेबसिरीजमध्ये समीर वानखेडे यांच्याशी सबंधित पात्र दाखवून एनसीबी आणि त्यांची मानहानी केल्याचा याचिकेत दावा करण्यात आला आहे.
त्याचबरोबरच त्या पात्राच्या तोंडून सत्यमेव जयते या डायलॉगनंतर आक्षेपार्ह दृश्य दाखवण्यात आल्याच म्हणत सत्यमेव जयतेची विटंबना केल्याचाही याचिकेत आरोप समीर वानखेडे यांनी केले आहे.
जवळपास 2 कोटींची ही मानहानीची याचिका असून ती वसूल झाल्यास कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत करणार असल्याचे याचिकेत म्हणण्यात आलेल आहे.