DNA मराठी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो ‘हे’ काम कराच; नाहीतर मिळणार नाही पैसे

ladki bahin yojana

Ladki Bahin Yojana : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजना चर्चेत आहे. या योजनेत अनेकांनी चुकीच्या मार्गाने फायदा घेतल्याने आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांना मिळणारे हप्ते अधिक सुलभ, सुकर व पारदर्शक व्हावेत यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावे असे आवाहन महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केले आहे.

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनी येत्या दोन महिन्यांत शासकीय पोर्टलवर जाऊन केवायसी करणे बंधनकारक असून, यासाठी ladkibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा असेही त्यांनी सांगितले.

या माध्यमातून लाडक्या बहिणींना योजनेंतर्गत लाभ वेळेत व अचूक मिळण्यास मदत होणार आहे.

याचबरोबर केवायसीमुळे महिला सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने सुरू केलेल्या इतर योजनांचा लाभही प्रत्येक पात्र महिलांपर्यंत पारदर्शकपणे मिळणार असल्याचे राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *