Maratha Reservation : आझाद मैदानावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत. या पार्श्वभूमीवर आज मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली.
मराठा आरक्षणाचा तातडीने तोडगा निघावा, मनोज मागण्या मान्य करण्यात याव्यात, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली. तसेच आंदोलनकर्त्या मराठा बांधवांना आझाद मैदान परिसरात मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशीही मागणी करण्यात आली.
“आंदोलन करणे हा लोकशाहीतील एक मूलभूत अधिकार आहे,” याची जाणीव या वेळी करून देण्यात आली.
बैठकीला शिवेंद्रसिंहराजे भोसले,मंत्री दादा भुसे, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, माणिकराव कोकाटे, प्रकाश सोळंके, सुरेश धस आणि विजयसिंह पंडित उपस्थित होते.
बैठकीनंतर प्रशासनाला तातडीने आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्याचे समोर आले आहे.