Ahilyanagar News : सरोदे परिवार व चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार व अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष अरुण रोडे पाटील शेळ्या मेंढ्या घेऊन तहसील कार्यालयामध्ये न्यायासाठी घुसले.
चिचोंडी पाटील येथील कौसाबाई मारुती सरोदे यांच्या मालकीच्या गट नंबर 1026 मधील सातबारा वरून तत्कालीन तलाठी सर्कल यांना हाताशी धरून खरेदीखत न घेता आणि फेरफार न बनवता समाजकंटकाने सरोदे परिवाराचे घर पाडून भूमिहीन करून 51 गुंठे जमीन बेकायदेशीर स्वतःच्या नावावर लावून घेतले आहे त्यामुळे सदर गट नंबर 1026 सातबारा वर माझ्या नावाची नोंद करून ताबा मिळावा व दोषींवर 420 चा गुन्हा दाखल व्हावा ही मागणी 12 वर्षापासून अनेक वेळा करून अनेक वेळा उपोषण करूनही अनेक सुनावण्या होऊन अहिल्यानगर तालुका तहसीलदार साहेबांनी सदर प्रकरण निकालावर बंद करून अहिल्यानगर तहसीलदार तथा तालुका न्याय दंडाधिकारी न्याय (निकाल )देत नसल्यामुळे पीडित कौसाबाई मारुती सरोदे व सरोदे परिवार हे आज सोमवार 16 जूनपासून जोपर्यंत न्याय देत नाही तोपर्यंत अहिल्यानगर तालुका तहसील कार्यालयातच शेळ्या मेंढ्यांना घेऊन राहणार असल्याचे प्रतिक्रिया देताना सरोदे परिवाराने व सरपंच यांनी सांगितले.
आज या आंदोलनस्थळी पीडित कौसाबाई मारुती सरोदे व सरोदे परिवार, चिचोंडी पाटीलचे शरद पवार,अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष अरुण रोडे पाटील, व धनगर बांधव मोठ्या संख्येने तहसील कार्यालय येथे उपस्थित होते या सर्वांनी तहसीलदार साहेब न्याय द्या,न्याय द्या.या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.