Dnamarathi.com

Pradeep Purohit : उठ सूट कुणीही महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर छत्रपती शिवरायांचा अवमान आणि बदनामी करत आहे. भाजपचेच सगळे वाचाळवीर शिवरायांचा अवमान करण्यात पुढे आहे. अशी टीका संतोष शिंदे, प्रवक्ता संभाजी ब्रिगेड यांनी केली आहे. तसेच भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांच्यावर महाराष्ट्र सरकारने गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील माध्यमांशी बोलताना संतोष शिंदे यांनी केली.

पुढे बोलताना ते म्हणाले की, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे मागच्या जन्मी शिवाजी महाराज होते अशा पद्धतीचं संसदेच्या सभागृहात वक्तव्य करणे हे अत्यंत निषेधार्य आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना फक्त स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच होऊ शकते. असं संतोष शिंदे म्हणाले. तर भाजपच्या खासदाराचं दुर्दैवी आणि आक्षेपार्ह वक्तव्य हे प्रशांत कोरटकर सारख्या शिवद्रोहींना पाठबळ देणार आहे. असेही यावेळी ते म्हणाले.

तर औरंग्याच्या कबरीवर आग पकड करणारे सत्ताधारी मंत्री राणे आणि त्यांच्या लोकांनी पुरोहित प्रकरणावर तोंड उघडावे असा आव्हान देखील त्यांनी यावेळी नितेश राणे यांना दिला.

सरकार जाणीवपूर्वक अजूनही प्रशांत कोरटकरला पकडत नाही. कारण तो भाजपचा माणूस आहे. या सगळ्यांचा ठरवून प्लान केला जात आहे. यापुढे तमाम शिवप्रेमींना मनुवादी यांचा हा कुटील डाव उध्वस्त करावा लागेल. मुख्यमंत्र्यांनी शिवद्रोह्यांना तात्काळ पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

काय म्हणाले होते प्रदीप पुरोहित?
देशाला एक शक्तिशाली राष्ट्र बनवण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. माझ्या बारगढ मतदारसंघात गिरीजा बाबा नावाचे एक संत राहतात. त्यांनी मला एक दिवस बोलताना सांगितलं की देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पूर्वजन्म हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा होता. त्यांचा दुसरा जन्म मोदी आहे. त्यामुळे या देशाला जगात सर्वात शक्तिशाली राष्ट्र करण्याच्या हेतूने ते काम करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *