Beed News : बीडच्या केज तालुक्यात सरपंच पतीचे अपहरण करून हत्या करण्यात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
माहितीनुसार, केज तालुक्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले होते. काही तासानंतर त्यांचा मृतदेह परिसरात आढळून आला.
संतोष देशमुख हे मसाजोगच्या महिला सरपंच अश्विनी देशमुख यांचे पती आहेत. सोमवारी दुपारी अज्ञात व्यक्तींनी त्यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला. देशमुख यांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा आहेत. त्यामुळे त्यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त होतोय. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय.
दरम्यान या घटनेनंतर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत बीडचा बिहार होतोय असा आरोप केलाय. सदरील घटना घडल्यानंतर पोलिसांशी स्वतः संपर्क करून देखील कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचं सोनवणे यांनी सांगितलं. तर मुख्य आरोपींना अटक करण्याची मागणी खासदार सोनवणे यांनी केली.