DNA मराठी

Israel Strikes : मोठी बातमी! इस्रायलकडून गाझावर पुन्हा हल्ला, 40 लोकांचा मृत्यू

Israel Strikes : गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या इस्रायल आणि हमास युद्धात आतापर्यंत हजारो नागरिकांचा मृत्यू झालाय. यातच आता पुन्हा एकदा इस्लायने गाझापट्टीवर मोठा हल्ला केला आहे. 

 माहितीनुसार इस्रायलच्या या हवाई हल्ल्यात 40 जणांचा मृत्यू झाला आहे तर 60 जण जखमी झाले आहेत. गाझाच्या नागरी संरक्षण संस्थेने ही माहिती दिली. 

मंगळवारी इस्रायलने पॅलेस्टाईनच्या दक्षिणेकडील भूभागावर हल्ला केला. इस्त्रायली सैन्याने म्हटले आहे की त्यांनी या भागातील हमास कमांड सेंटरला टार्गेट केले आहे. गाझामधील खान युनिस शहरातील अल-मवासी भागात इस्रायली लष्कराने हा हल्ला केला. हा असा भाग आहे की इस्त्रायली सैन्याने युद्ध सुरू झाल्यावर सुरक्षित क्षेत्र घोषित केले होते. हजारो पॅलेस्टिनींनी येथे आश्रय घेतला आहे.

स्थानिक आणि डॉक्टरांनी सांगितले की, खान युनिस जवळील अल-मवासी येथील तंबूच्या छावणीला चार क्षेपणास्त्रांनी मारले. हा छावणी विस्थापित पॅलेस्टिनींनी भरलेला आहे. गाझा सिव्हिल इमर्जन्सी सर्व्हिसच्या म्हणण्यानुसार, 20 तंबूंना आग लागली. इस्रायली क्षेपणास्त्रांनी 30 फूट खोल खड्डे तयार केले आहेत. 60 जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.

40900 हून अधिक पॅलेस्टिनींना आपला जीव गमवावा लागला आहे

खान युनिसमधील कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या हमासच्या दहशतवाद्यांवर हल्ला केल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे. हमासने इस्रायलचे आरोप फेटाळले आहेत. हे खोटे असल्याचे हमासने एका निवेदनात म्हटले आहे.  

7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर मोठा हल्ला केला. यामध्ये 1200 इस्रायली मारले गेले आणि 250 लोकांना ओलिस बनवण्यात आले. त्यानंतर इस्रायलने हमासविरुद्ध युद्धाची घोषणा केली होती. गाझावरील इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 40,900 हून अधिक पॅलेस्टिनींना आपला जीव गमवावा लागला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *