DNA मराठी

Ahmednagar News: मोठी बातमी! अटकपूर्व जामीनसाठी पंकज जावळे यांचा अर्ज, आज होणार सुनावणी

Pankaj Jawle

Ahmednagar News: अहमदनगर महापालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांनी आठ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीनसाठी अहमदनगर न्यायालयामध्ये अर्ज केला आहे.

पंकज जावळे यांच्या या अर्जावर आज (4 जुलै) दुपारनंतर अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. 

 एसीबीने एका बांधकाम व्यवसायिकाला आठ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी आयुक्त पंकज जावळे आणि स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तेव्हापासून आयुक्त पंकज जावळे आणि देशपांडे दोघेही फार आहेत. सध्या पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

 छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यातील एसीबीचे पथकाने अहमदनगर महापालिकेत कारवाई करून पंकज जावळे आणि स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सुनवाईत त्यांना अटकपूर्व जामीन मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *