Ahmednagar News- जिल्ह्यातील ऊस बागायतदार शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे तर दुसरीकडे कारखान्यांकडून त्यांची देयके थकीत ठेवली जात आहे. शेतकरी उसाचे बिल व त्यावरील व्याज वेळेवर मिळत नसल्याने कर्जबाजारी होत चालला असल्याने आर्थिक हदबल होत आहे.
धक्कादायक म्हणजे शेतकऱ्यांचीच असणारे जिल्हा बँक ही कर्ज बुडवणाऱ्या साखर कारखानदारांना कर्ज देण्याची चुकीचे धोरण अवलंबत आहे. या गोष्टीचा निषेध व शेतकऱ्यांना त्यांची थकीत देयके हे तातडीने मिळावी यासाठी येत्या काळात ट्रॅक्टर ट्रॉली, ट्रक भरून मंत्रालयावरती मोर्चा काढणार आहे अशी माहिती यावेळी प्रहारच्या वतीने देण्यात आली.
प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे पत्रकार परिषद घेत हम कडून शेतकऱ्यांची देयके ही थकीत ठेवले जात असल्याचं म्हणत जिल्हा बँकेच्या कारभारावर देखील ताशेरे ओढले. यावेळी बोलताना पोटे म्हणाले की हंगाम सुरू करण्यापूर्वी भाव जाहीर न करणे, भाव जाहीर न करता कारखाने तीन-चार महिने चालवू नये. भाव जाहीर केल्याप्रमाणे पैसे न देता एफआरपी कायद्यानुसारच पैसे देणे. तसेच शेतकऱ्यांचीच असणारे जिल्हा बँक बुडवणाऱ्यांनाच साखर कारखानदारांनाच कर्ज देण्याची चुकीचे धोरणे जिल्हा बँकेकडून आखले जात आहेत.
ऊस असूनही उसाला वेळेवर तोड न देता कार्यक्षेत्राच्या बाहेरून ऊस आणणे एच एन टी मध्ये भ्रष्टाचार असा आरोप देखील यावेळी पोटे यांनी केला.