Health Tips : टायफाइडमध्ये लोकांना तापाबरोबरच डोकं दुखी, छातीत जळजळ सारख्या समस्यांना सामोरी जावं लागतं. यामुळे या लेखात जाणून घ्या कश्या प्रकारे सुटका मिळवता येईल.
टायफाइडच्या तापाला मियादी ताप म्हणजे अधून -मधून येणारा ताप देखील म्हणतात. टायफाइडचा ताप पचन तंत्राच्या आणि रक्तप्रवाहातील असलेल्या साल्मोनेला टायफी नावाच्या एका बॅक्टेरिया मुळे होतो हा घाणपाणी आणि संक्रमित खाण्यामुळे आपल्या शरीरात शिरकाव करतो.
या आजारात संक्रमित झालेल्या माणसाचं शरीराचं तापमान 104 डिग्री फॅरेनहाईट पर्यंत पोहोचतो. टायफाइड पासून मुक्त होण्याचे काही घरघुती उपचार.
टायफाइडची लक्षणे
ताप येतो
भूक लागत नाही
डोकं दुखणं
थंडी जाणवते
जास्त अशक्तपणा जाणवणं
अतिसाराची समस्यां
छातीत जळजळ होणं
बद्धकोष्ठता होणं
टायफाइड पासून मुक्त होण्यासाठी काही घरघुती उपचार
तुळस
तुळस आणि सूर्यमुखीच्या रसला काढून प्यायलानं आपणास फायदा होणार. या व्यतिरिक्त एका भांड्यात पाणी आणि थोडी तुळशीचे पान टाकून उकळवून घ्या. दिवसातून 3 ते 4 वेळा असेच पिऊन घ्या.
सफरचंदाचा रस
सफरचंदाचा रस टायफाइडच्या समस्येपासून मुक्त करू शकतो. या साठी आपण सफरचंदाच्या रसात आल्याचं रस मिसळून प्या. असे केल्यानं आपल्याला टायफाइडच्या तापापासून आराम मिळेल.
लसूण
लसूण अँटिबायोटिक, अँटिऑक्सिडंट असण्यासह उष्ण प्रकृतीचा आहे. यासाठी साजूक तुपात 6 -7 पाकळ्या लसणाच्या तळून घ्या. यामध्ये सेंधव मीठ घालून खावं.
लवंग
लवंग देखील या आजारापासून मुक्त करण्यासाठी प्रभावी आहे. या साठी आठ कप पाण्यात 6 ते 7 लवंगा टाकून उकळवून घ्या. पाणी अर्ध झाल्यावर याचे सेवन दिवसभर करावं. असे केल्यानं टायफाइड मुळे आलेला अशक्तपणा देखील कमी होणार.
मध
मधात अँटिव्हायरल, अँटीबॅक्टीया, अँटीऑक्सीडेंट सारखे गुणधर्म आढळतात. कोमट पाण्यात एक चमचा मध टाकून प्यावं. या मुळे आपणास आराम मिळेल.