Weather Update: देशात दररोज बदलणाऱ्या वातावरणामुळे काही भागात मुसळधार पाऊस तर काही भागात थंडीने पुन्हा एकदा लोकांच्या अडचणीत वाढ केली आहे.
आज सकाळी देशातील बहूतेक भागात रिमझिम पाऊसही पाहायला मिळाला.
तर दुसरीकडे देशाची राजधानी दिल्लीच्या आसपासच्या हवामानाचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे.
याच बरोबर ईशान्येकडील राज्यांमध्ये पुन्हा हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे, ज्यामुळे काही ठिकाणी तापमान वाढत आहे तर काही ठिकाणी घसरत आहे.
दक्षिण भारतातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची नोंद होत आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांमध्ये पाऊस आणि मेघगर्जनेचा इशारा दिला आहे.
येथे हवामान कसे असेल?
IMD नुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्याने राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. देशातील विविध भागात मुसळधार पावसासाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक राज्यांमध्ये गारपीट आणि वादळी पावसाची शक्यता आहे.
सोमवारी जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवार आणि बुधवारी ढगाळ वातावरण आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. 19 आणि 20 फेब्रुवारी दरम्यान पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि उत्तर राजस्थानच्या विविध भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. हवामानातील हा बदल फक्त वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे नोंदवला जाऊ शकतो.
इथे मुसळधार पाऊस पडेल
IMD नुसार, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये 19-21 फेब्रुवारी दरम्यान वादळ, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय 19 आणि 20 फेब्रुवारी दरम्यान राजस्थानमध्ये आणि 20-22 फेब्रुवारी दरम्यान पूर्व उत्तर प्रदेशात विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह तुरळक वादळे अपेक्षित आहेत.
जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट आणि हिमाचल प्रदेशच्या सर्व भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी अपेक्षित आहे. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.