DNA मराठी

Maratha Reservation: अहमदनगर जिल्ह्यातून मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये दाखल होणार ‘इतक्या’ बसेस

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणी करिता आमरण उपोषणसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये येत्या काही दिवसात पायी दाखल होणार आहे.

यासाठी पाटील यांनी 20 जानेवारी 2024 ला सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटी येथून या वारीची सुरुवात केली आहे.

तर अहमदनगर जिल्ह्यात 21 जानेवारी रोजी ही वारी दाखल झाली होती. अहमदनगर शहराच्या नजीक असणाऱ्या बारा बाभळी मदरसा परिसरात पाटील यांचा रात्री मुकाम झाला तर आता पाटील अहमदनगर शहरातून पुण्याकडे रवाना झाले आहे.

तर दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यातून मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी 25 जानेवारी रोजी लाखोंच्या संख्येत नागरिक पनवेलसाठी रवाना होणार आहे. यासाठी आतापर्यंत जिल्ह्यातून 100 पेक्षा जास्त बसेस बूक झाले असल्याची माहिती संघटनेने दिली आहे.

याच बरोबर येत्या काही दिवसात ही संख्या आणखी वाढणार असल्याची देखील महिती संघटनेने दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *