DNA मराठी

Ahmednagar News: बहुचर्चित ओंकार गामा भागानगरे खुनातील आरोपीला जामीन मंजूर…

IMG 20240122 WA0001

Ahmednagar News: अहमदनगर शहरात चर्चेचा विषय ठरलेला ओंकार गामा भागानगरे खून प्रकरणात पोलिसांकडून अटक करण्यात आलेले आरोपी सागर प्रवीण गुडा याचा मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाकडून जामीन मंजूर झाला आहे.

19 जून 2023 रोजी ओंकार भागानगरे याचा खून झाला होता. यानंतर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

 या प्रकरणात अटक आरोपी सागर प्रवीण गुडा याचा सेशन्स कोर्ट अहमदनगर येथे जामीन फेटाळल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्याच्या 

 जामिनाची आज रोजी सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने काही अटी व शर्तीवर आरोपीस जामीन मंजूर केलेला आहे.

 सदर आरोपीच्या वतीने अँड. निलेश घाणेकर अँड. सरिता साबळे व अँड सतीश गीते यांनी काम पाहिले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *