Marriage Viral Advertisements : आपल्या देशात गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन डेटिंग ॲप्स आणि सोशल मीडियावर लग्नाच्या जाहिरातींचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
यातच सोशल मीडियावर एका लग्नाची जाहिरात व्हायरल होत आहे. या जाहिरातीमध्ये 30 वर्षीय महिला आदर्श पती शोधत आहे.
या महिलेला लग्नासाठी मुलगा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असावा आणि त्याच्याकडे किमान 28 एकरचे फार्महाऊस असावे, अशी मागणी 30 वर्षीय महिलेने केली आहे. सोशल मीडियावर या जाहिरातीवर लोकांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
एका 30 वर्षीय महिलेची जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर या अजब जाहिरातीने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
काय आहे महिलेची मागणी?
30 वर्षीय महिला लग्नासाठी आदर्श पती शोधत आहे. ज्यांचे वय 25 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावे. आणि तो आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असावा तसेच त्याच्याकडे चांगला आणि मजबूत व्यवसाय असणे आवश्यक आहे. मुलाकडे किमान 28 एकरचा बंगला किंवा फार्महाऊस असावा. मुलाला स्वयंपाक कसा करावा हे माहित असले पाहिजे.
या पोस्टला 3,000 हून अधिक वेळा लाईक केले गेले आहे आणि 800 हून अधिक वेळा शेअर केले गेले आहे.