DNA मराठी

Haryana Election : सामना फिरला, हरियाणात भाजप करणार हॅट्रिक? जाणून घ्या ताजे अपडेट

Haryana Election : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येत आहे. सध्या निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार भारतीय जनता पक्ष 47 जागांवर पुढे असून काँग्रेस 36 जागांवर पुढे आहे. त्यामूळे भाजपने ताज्या आकडेवारीनुसार बहुमताचा आकडा पार केला आहे मात्र हे कल असल्याने हरियाणामध्ये पुन्हा एकदा सामना फिरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली होती तेव्हा काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला होता मात्र आता कल बदलत असल्याने पुढील 1-2 तासात चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे जम्मू आणि काश्मीरमध्ये देखील जबरदस्त फाईट पाहायला मिळत आहे. जम्मू काश्मीरमध्ये सध्या काँग्रेस आघाडीने बहुमतचा आकडा पार केला आहे तर भाजप 28 जागांवर पुढे आहे. 

एक्झिट पोलमध्ये हरियाणामध्ये काँग्रेस पक्ष 55 ते 60 जागांवर विजय मिळवणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता तर भाजपला 20 ते 30 दरम्यान जागा मिळणार असं देखील अनेक एक्झिट पोलचं म्हणणं होतं. मात्र प्रत्यक्षात भाजप सध्या हरियाणामध्ये तिसऱ्यांदास सरकार स्थापन करण्याच्या जवळ दिसत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *