WCL IND vs PAK : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स स्पर्धा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इंडियन चॅम्पियन संघाने सेमीफायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिल्याने या स्पर्धेचा पहिला सेमीफायनल सामना 31 जुलै रोजी एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे होणार आहे. मात्र भारतीय संघाने खेळण्यास नकार दिल्याने आता आयोजक काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
भारतीय संघाने वेस्ट इंडिज चॅम्पियन्सचा पराभव करत या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये एन्ट्री केली आहे. स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार, इंडियन चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यामध्ये सेमी फायनलचा सामना 31 जुलै रोजी होणार आहे. मात्र भारतीय संघ या सामन्यात खेळणार की नाही याबाबत कोणताही निर्णय झालेला अशी माहिती समोर आली आहे.
या स्पर्धेचे लीग सामन्यात देखील भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता. यावेळी युसुफ पठाण, इरफान पठाण, युवराज सिंग, हरभजन सिंग आणि शिखर धवन या खेळाडूंनी पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार दिल्यानंतर सामना रद्द करण्यात आला होता.
नेमकं प्रकरण काय?
जम्मू आणि कश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते. या दहशतवादी हल्ल्यापाठीमागे पाकिस्तान असल्याने पाकिस्तानसोबत कोणताही सामना खेळणार नसल्याची घोषणा अनेक खेळाडूंनी केली होती.