Virat Kohli : भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान 5 कसोटी सामन्याची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने चमकदारी कामगिरी करत इंग्लंडचा पराभव केला आहे. त्यामुळे आताही मालिका 1-1 ने बरोबरीत आहेत.
तर दुसरीकडे पुढील तीन सामन्यासाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा होणार आहे, मात्र त्यापूर्वी भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे.
असे मानले जात आहे की विराट कोहली भारताचे आणखी दोन आगामी सामने गमावू शकतो. यामुळे यजमान संघाच्या अडचणी वाढणार हे नक्की.
कोहली तिसरा आणि चौथा सामनाही खेळणार नाही
कसोटी मालिकेत आघाडी घेण्याच्या इराद्याने भारतीय संघ 15 फेब्रुवारीला तिसरा सामना खेळणार आहे. हा सामना राजकोटच्या मैदानावर खेळला जाईल. हा कसोटी सामना सुरू होण्याआधी टीम इंडियाच्या अडचणी खूप वाढल्या आहेत.
म्हणून कोहली खेळू शकणार नाही
भारतीय संघातील दिग्गज खेळाडूंपैकी एक विराट कोहली आगामी दोन सामन्यांमध्ये सहभागी होणार नाही, ज्याचे कारण जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
बीसीसीआयने ही माहिती दिली. बीसीसीआयने सांगितले होते की, किंग कोहली वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या दोन कसोटींमधून बाहेर पडला आहे.
यानंतर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सने खुलासा केला होता की कोहली दुसऱ्यांदा पिता होणार आहे आणि त्यामुळे तो संघासोबत नाही.
सध्या भारतीय संघ स्वतःच्या होस्टिंग अंतर्गत 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. दोन सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत आहेत. आता सगळ्यांचे लक्ष शेवटच्या तीन सामन्यांवर लागले आहे.