New Rules: उद्यापासून नवीन महिन्याची सुरुवात होणार आहे. याचबरोबर देशात देखील नवीन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून काही नियमात बदल होणार आहे. ज्याच्या फटका सर्वसामान्यांना बसण्याची शक्यता आहे.
हे जाणुन घ्या, देशात 1 मार्चपासून केवायसी, जीएसटी, एलपीजी सिलिंडर आणि बँकिंगशी संबंधित नियमांमध्ये बदल होणार आहेत.
एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल
एलपीजी सिलिंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी बदलतात. 1 मार्च रोजी सिलिंडरच्या किमतीत बदल होऊ शकतो. 1 फेब्रुवारी रोजी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 14 रुपयांची वाढ करण्यात आली होती.
सोशल मीडियाचे नवीन नियम
1 मार्च रोजी सोशल मीडियाशी संबंधित नियमांमध्येही बदल होणार आहे. सरकारने नवीन माहिती तंत्रज्ञान नियम लागू केले आहेत. जे फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्रामसह सर्व सोशल मीडिया कंपन्यांना फॉलो करावे लागेल. नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आकारला जाऊ शकतो.
बँक सुट्टी
आरबीआयने मार्चमध्ये होणाऱ्या बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. पुढील महिन्यात 14 दिवस बँका बंद राहणार आहेत. यात शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. आणि 14 दिवसांपैकी 8 सुट्या सणांसाठी आहेत.
फास्टॅग केवायसी नियम
तुम्ही अजून FasTag KYC अपडेट केले नसेल, तर ते 29 मार्च 2024 पर्यंत करा. NHAI ने Fastag KYC साठी KYC अपडेट अनिवार्य केले आहे. काम पूर्ण न झाल्यास तुमचे फास्टॅग खाते काळ्या यादीत टाकले जाऊ शकते.
जीएसटीशी संबंधित नवीन नियम लागू होणार
करचोरी रोखण्यासाठी जीएसटीशी संबंधित नवीन नियम 1 मार्चपासून लागू होऊ शकतो. ज्या अंतर्गत ई-चलानसाठी ई-वे बिल तयार करण्याची गरज भासणार नाही.