DNA मराठी

Sanjay Raut: ‘या’ दिवशी महाविकास आघाडीची पहिली यादी येणार, संजय राऊत यांनी जाहीरचं करून टाकलं

Sanjay Raut:  कालच नायब सैनी सांगत होते निवडणूक जिंकून घेण्यासाठी मी पूर्ण बंदोबस्त केलेला आहे. वेबसाईटवर काँग्रेस मागे आहे असं दिसतं पण पूर्ण निकाल होऊ द्या. इथे जसा मराठी माणूस लढवायला आहे तसा तिथे हरियाणातील मतदार देखील लढला आहे. अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

तसेच हरियाणामध्ये काँग्रेसची सरकार येणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

तर महाराष्ट्रात राहुल गांधी, किंवा प्रियंका गांधीला मुख्यमंत्री व्हायचं नाही येथे स्थानिक नेतृत्व आहेत. शरद पवार ,उद्धव ठाकरे आम्हाला माहित आहे जागावाटप कसा व्हायला पाहिजे पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये आमचं जागा वाटपाचा टास्क पूर्ण होईल अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

 दसऱ्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीची पहिली यादी जाहीर होईल. काँग्रेसचा मुख्यमंत्री हा दिल्लीत निश्चित होतो येथे बोलून काही होणार नाही. आमच्या पार्टीचा हाय कमांड महाराष्ट्र मुंबईत आहे त्यामुळे या संदर्भातील निर्णय आम्ही महाराष्ट्रात घेतो असेही ते म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *