Tata CNG Car : भारतीय बाजारात टाटा ऑटो कंपनी लोकप्रिय हॅचबॅक कार टियागोचे अपडेटेड व्हर्जन लॉन्च केले आहे. नवीन कारमध्ये एकापेक्षा एक फीचर्स स्टाइलिंग अपडेट्स आणि नवीन ट्रान्समिशन पर्याय ग्राहकांना देण्यात आले आहे.
2025 टाटा टियागो एनआरजीची किंमत आता 7.2 लाख ते 8.75 लाख एक्स-शोरूम आहे. हे मॉडेल फक्त टियागोच्या टॉप-स्पेक XZ ट्रिममध्ये उपलब्ध आहे. 2025 च्या टियागो प्रमाणेच, नवीन टियागो एनआरजीमध्ये मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन आहे, तर मोठा बदल म्हणजे सीएनजी-एएमटी पर्याय.
2025 टाटा टियागो एनआरजीमध्ये काही किरकोळ स्टायलिश अपडेट्स आहेत. यामध्ये नवीन मॅट ब्लॅक क्लॅडिंगसह नवीन डिझाइन केलेला बंपर आणि पुढील आणि मागील बाजूस जाड सिल्व्हर स्किड प्लेट्सचा समावेश आहे. 15-इंच स्टीलच्या चाकांना वेगवेगळे कव्हर मिळतात.
कारमध्ये सीएनजीचा पर्याय
टाटा टियागो एनआरजीमध्ये 1.2-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे, जे 84.8 बीएचपी पॉवर निर्माण करते. हे 5-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी युनिटसह जोडलेले आहे. सीएनजी व्हर्जन 71 बीएचपी पॉवर निर्माण करण्यासाठी तयार केलेली आहे आणि 5-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी युनिटशी जोडलेली आहे. या मॉडेलसाठी CNG-AMT हा एक पूर्णपणे नवीन पर्याय आहे आणि गेल्या वर्षी Tiago CNG मध्ये सादर करण्यात आला होता. अपडेटेड टाटा टियागो एनआरजी मारुती सुझुकी स्विफ्ट, ह्युंदाई ग्रँड आय10 निओस या कारशी स्पर्धा करणार आहे.