DNA मराठी

Supriya Sule

Rohit Pawar: राष्ट्रवादीत बदलाचे वारे, अजितदादांपेक्षा वेगळे दाखविण्याचा प्रयत्न, रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

Rohit Pawar: गेल्या काही दिवसांत विविध पदे आणि उमेदवारी वाटपांच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात कुटुंबातील आणि मर्जीतील व्यक्तींना संधी देण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आता वेगळी भूमिका घेतली आहे. पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात आमदार रोहित पवार यांनी यासंबंधीचे संकेत दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत कार्यक्रम झाला. येत्या पंधरा दिवसांत पक्षात फेरबदल केले जाणार असून ज्यांचे कोणा नेत्याशी नाते, घराणेशाहीशी संबंध नाही, अशा सामान्य पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचे आमदार पवार म्हणाले आहेत. रोहित पवार म्हणाले, पुढील दहा पंधरा दिवसात पक्षात संघटनात्मक बदल करण्यात येणार आहे. यामध्ये नव्या कार्यकर्त्यांना पदे देण्यात येणार आहेत. ज्यांचे कोणाही नेत्याशी नाते नाही, ज्यांचा घराणेशाहीशी संबंध नाही, अशा कार्यकर्त्यांना पक्षाची पदे दिली जाणार आहेत. ग्रामीण भागातील कार्यकर्ते, युवक आणि महिलांना पुढे आणण्यावर भर दिला जाणार आहे. पक्ष मजबुत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षात बदल करण्याच्या घोषणा शक्यतो स्वतः शरद पवार करीत असतात. यावेळी पवार किंवा कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्याऐवजी आमदार रोहित पवार यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे रोहित पवार यांनाही पक्षात मोठी संधी मिळणार असल्याचे मानले जात आहे.

Rohit Pawar: राष्ट्रवादीत बदलाचे वारे, अजितदादांपेक्षा वेगळे दाखविण्याचा प्रयत्न, रोहित पवार नेमकं काय म्हणाले? Read More »

Sharad Pawar On PM Modi : अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होणार, मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Sharad Pawar on PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथे बोलताना देशातील नागरिकांना पुढील एका वर्षासाठी सोने खरेदी टाळण्याचे तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या बचतीसाठी जास्तीत जास्त वर्क फ्रॉर्म होम आणि विदेशी प्रवास टाळण्याचे आवाहन केल्याने देशात सध्या खळबळ उडाली आहे. विरोधक मोदी यांच्या या आहवानानंतर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे. तर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांनी देखील यावर भाष्य करत प्रधानमंत्र्यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी. राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर सर्व पक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय-प्रक्रिया राबविण्याचा सल्ला दिला आहे. शरद पवार यांनी एक्सवर म्हटले आहे की, मध्यपूर्वेतील अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी काही घोषणा केल्या. त्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. या घोषणा अचानक करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्र तसेच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब निश्चितच काळजी निर्माण करणारी आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रधानमंत्र्यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी. राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर सर्व पक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय-प्रक्रिया राबविणे देशहितासाठी अत्यंत आवश्यक आहे. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने अधिक संवेदनशीलता आणि व्यापक सल्लामसलत यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. यासोबतच प्रधानमंत्र्यांनी देशातील नामवंत अर्थतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि संबंधित तज्ज्ञांची तातडीने बैठक बोलावून परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा. पुढील धोरणांबाबत व्यापक विचारविनिमय करावा. देशातील जनतेमध्ये विश्वास आणि स्थैर्य निर्माण करणे, यालाच सद्यस्थितीत सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, अशी आमची ठाम भूमिका आहे असं शरद पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. नरेंद्र मोदींनी देशाला कोणती आवाहनं केली? पुढील एका वर्षासाठी सोन्याची खरेदी टाळा वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा नैसर्गिक शेतीचा अवलंब करा परदेश प्रवास टाळा खाद्यतेलाचा वापर कमी करा

Sharad Pawar On PM Modi : अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होणार, मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया Read More »

img 20260428 wa0002

Sharad Pawar: मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र येणार पण सुनेत्रा पवार राहणार गैरहजर; कारण काय?

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांनी आज पुण्यातील मोदी बागेत पवार कुटुंबासाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी शरद पवार यांच्याकडून बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राज्यसभा खासदार पार्थ पवार, आमदार रोहित पवार, जय पवार आणि योगेंद्र पवार यांना देखील आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे या स्नेहभोजनादरम्यान पवार कुटुंब काही महत्वाचे निर्णय घेणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे एकीकडे या स्नेहभोजनासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येत असताना राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनिता पवार या स्नेहभोजनाला गैरहजर राहणार आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे सुनेत्रा पवार पुण्यात मोदी बाग स्नेहभोजनाचा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता कमी असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांना स्नेहभोजनाचा कार्यक्रमाला उपस्थित राहता येत नसल्यामुळे काल रात्री उशिरा खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांची मुलगी रेवती सुळे यांनी सुनेत्रा पवार यांची देवगिरी निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान पार्थ पवार देखील उपस्थित होते. आज होणाऱ्या स्नेहभोजन कार्यक्रमादरम्यान पुन्हा एकदा राष्ट्रवादी विलीनीकरणावर चर्चा होणार का याबाबत देखील सध्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत असल्याने आज होणाऱ्या स्नेहभोजन कार्यक्रमावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

Sharad Pawar: मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र येणार पण सुनेत्रा पवार राहणार गैरहजर; कारण काय? Read More »

samarjit ghatge

Samarjit Ghatge : शरद पवारांना मोठा धक्का; समरजित घाटगे करणार घर वापसी! ‘या’ दिवशी भाजपात प्रवेश

Samarjit Ghatge : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप येणार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि कोल्हापूर जिल्यातील कागलचे प्रभावी नेते समरजितसिंह घाटगे पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त अखेर निश्चित झाला असून, उद्या बुधवारी (8 एप्रिल) मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात हा प्रवेश होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत समरजित घाटगे यांचा पक्षप्रवेश पार पडेल. या संदर्भात मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालया बाहेर घाटगे समर्थकांकडून बॅनर लावण्यात आले आहे. समरजित घाटगे यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सोडून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. कागल विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी पक्ष बदलला होता. मात्र, आता पुन्हा भाजपकडे वळण्याचा निर्णय घेतल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळणार आहे. घाटगे यांचा भाजप प्रवेश हा शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये भाजपची ताकद वाढणार आहे. 2024 विधानसभा निवडणुकीत त्यांना महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

Samarjit Ghatge : शरद पवारांना मोठा धक्का; समरजित घाटगे करणार घर वापसी! ‘या’ दिवशी भाजपात प्रवेश Read More »

Sharad Pawar: मोठी बातमी! ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडली

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडली असून त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, बारामतीमध्ये प्राथिमक उपचार घेतल्यानंतर त्यांना दुपारी पुण्याला हलविण्यात आले आहे. दोन दिवसांपासून त्यांना अवस्वस्थ वाटत असल्याचे सांगण्यात आले. सोमवारी सकाळी आणखी त्रास जाणवल्याने बारामतीतील डॉक्टरांनी तपासणी केली. मात्र, त्यानंतर दुपारी त्यांना तातडीने पुण्याला हलविण्याच सल्ला देण्यात आला. माहितीनुसार, शरद पवार यांना श्वासनाचा आणि खोकल्याचा त्रास असल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यात दाखल करण्यात आले आहे.

Sharad Pawar: मोठी बातमी! ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडली Read More »

maharashtra politics

Maharashtra Politics : अजित पवार – अमित शहांची चर्चा अन् सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रीपद; नेमकं  ‘फॉर्म्युला’ काय ठरला होता?

Maharashtra Politics:  अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला आहे. दोन्ही गटाकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहे. शरद पवार गटाच्या दाव्यानुसार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजितदादांची तीव्र इच्छा होती. याबाबतची प्रक्रिया केवळ कौटुंबिक पातळीवर मर्यादित नसून, त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचाही हिरवा कंदील मिळाला होता. विलीनीकरणाच्या हालचालींची नागपूरला सुरुवात विलीनीकरणाच्या हालचालींची सुरुवात नागपूर अधिवेशनादरम्यान अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील बैठकीतून झाली. अजित पवार यांनी या विषयाची कल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली होती. फडणवीस यांनी हा विषय केंद्राशी संबंधित असल्याचे सांगितल्यानंतर, अहिल्यानगरमध्ये अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात यावर प्राथमिक चर्चा झाली. त्यानंतर अमित शाह यांनी पंतप्रधान मोदींशी चर्चा करून या विलीनीकरणाला संमती मिळवून दिली, असा दावा सूत्रांनी केला आहे. मंत्रिपदाचा ‘फॉर्म्युला’ आणि सत्तेचे वाटप तर दुसरीकडे विलीनीकरणानंतरच्या सत्तेच्या वाटपाबाबतही काही महत्त्वाचे मुद्दे निश्चित करण्यात आले होते. या प्रस्तावानुसार, शरद पवार यांचा गट अजित पवार यांच्या पक्षात विलीन झाल्यास सुप्रिया सुळे यांना केंद्र सरकारमध्ये मंत्रिपद देण्याचे ठरले होते. तसेच जयंत पाटील किंवा रोहित पवार यापैकी एका नेत्याला राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान देण्याचा प्रस्ताव होता. 16 जानेवारी रोजी पुण्यात झालेल्या बैठकीत अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार आणि अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत यावर सविस्तर चर्चा झाली होती. राजकीय अडचण अजित पवार यांच्या विलीनीकरणाच्या या प्रयत्नांना त्यांच्या स्वतःच्याच पक्षातील काही नेत्यांचा विरोध होता, असे बोलले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे, शरद पवार गटाकडे संसदेत असलेली अधिक ताकद. जर हे विलीनीकरण झाले असते, तर सुप्रिया सुळे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेश निश्चित झाला असता, ज्यामुळे अजित पवार गटातील इतर नेत्यांची मंत्रिपदाची संधी हुकली असती. या अंतर्गत वादामुळे ही प्रक्रिया काहीशी संथ झाली होती असं सांगण्यात येत आहे. दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुका दोन्ही गटांनी ‘घड्याळ’ चिन्हावर एकत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. अजितदादांच्या निधनानंतर आता हे विलीनीकरण पूर्ण होणार की राष्ट्रवादीमधील पेच अधिक वाढणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Politics : अजित पवार – अमित शहांची चर्चा अन् सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रीपद; नेमकं  ‘फॉर्म्युला’ काय ठरला होता? Read More »

ajit pawar

Ajit Pawar: पुण्यात हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा; उपमुख्यमंत्री अजित पवार नेमके गेले कुठे?

Ajit Pawar: पुणे महापालिका निवडणुकीसाठी सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असून आता एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार पुणे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणारी चर्चा फिस्कटली असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक सकाळी बारामती हॉस्टेल मधून पोलीस संरक्षण,पोलीस ताफा काहीही न घेता एकटे निघाले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नेमके कुठे गेले याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, अजित पवार बारामती हॉस्टेल मधून निघून जिजाई या त्यांच्या निवासस्थानी असण्याची शक्यता आहे. अजित पवार बारामती हॉस्टेल मधून ज्या गाडीतून निघाले ती गाडी जिजाई बंगल्या मध्ये असल्याने अजित पवार देखील जिजाई बंगल्यातच असण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे युतीसाठी अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात बैठक झाली असल्याची देखील माहिती समोर आली आहे. अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली असून लवकरच युती बाबत निर्णय होणार असल्याचे देखील बोलले जात आहे. पुणे महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गट या निवडणुकीत एकत्र लढणार असून काँग्रेस स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

Ajit Pawar: पुण्यात हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा; उपमुख्यमंत्री अजित पवार नेमके गेले कुठे? Read More »

supriya sule

Supriya Sule: फडणवीससाहेब लक्ष द्या, भाजपमध्ये ड्रग्ज प्रकरणातील आरोपीचा प्रवेश; सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Supriya Sule: तुळजापूरमध्ये ड्रग्ज प्रकरणातील आरोपीने भाजपमध्ये जाहीर प्रवेश केल्याने राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. विरोधक आता चारही बाजूने भाजपावर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तुळजापूर शहरातील काहीजणांना काल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देण्यात आला. यामध्ये शहरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींंचा देखील समावेश होता, अशी बातमी वाचनात आली. विशेष म्हणजे हे प्रवेश भाजपच्या पक्ष कार्यालयात आणि जबाबदार नेत्यांच्या उपस्थितीत झाले याचे सखेद आश्चर्य वाटले. यासोबतच ड्रग्स तस्करीला राजाश्रय मिळतोय हे पाहून तितकीच चिंता देखील वाटली. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक राजकीय पक्षाला आपली संघटना वाढविण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. परंतु त्याचवेळी कोणत्याही अनिष्ट, समाजविघातक प्रवृत्तीला थारा न देण्याची नैतिक जबाबदारी देखील सार्वजनिक आयुष्यात कार्यरत असणाऱ्या प्रत्येकावर असते,याबाबत आपणही सहमत असाल. आपण राज्याचे प्रमुख आहात, आपल्यासमोर अनेक कामे पडलेली असतात. त्यामुळे कदाचित ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचली नसावी, किंवा सदर व्यक्तीच्या ड्रग्स गुन्हेगारीमधील पार्श्वभूमीबाबत आपल्याला माहिती देण्यात आली नसावी. हे गृहित धरुन मी आपणास हे पत्र लिहित आहे. समाजहित डोळ्यासमोर ठेवून ड्रग्जविरोधी लढ्यात आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत. या संदर्भात मी यापूर्वीही आपणांस पत्राद्वारे कळविले होते. तुळजापूरमधील या प्रकाराकडे आपण गांभीर्याने लक्ष घालून संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई कराल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. ड्रग्स तस्करीला या महाराष्ट्रात राजाश्रय दिला जाणार नाही अशा प्रकारचा सकारात्मक संदेश समाजात जाण्यासाठी आणि ड्रग्जविरोधी मोहिमेला बळकटी मिळावी यासाठी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. याची आपण योग्य ती दखल अवश्य घ्याल की अपेक्षा आहे. असं सुप्रिया सुळे पत्रात म्हणाल्या.

Supriya Sule: फडणवीससाहेब लक्ष द्या, भाजपमध्ये ड्रग्ज प्रकरणातील आरोपीचा प्रवेश; सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र Read More »

छगन भुजबळ तो झाकी है सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील अभी बाकी है! लक्ष्मण हाके स्पष्ट बोलले

Laxman Hake on Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज मंत्रीपदाची शपथ घेणार आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर मंत्री पदासाठी अजित पवार कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ देखील अजित पवारांवर नाराज असल्याचे वृत्त समोर येत असल्याने छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती मात्र आता अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना मंत्रीपदाची संधी देत भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले असल्याचे देखील बोलले जात आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळ तो झाकी है सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील अभी बाकी है. सुप्रिया सुळे केंद्रात , रोहित पवार, जयंत पाटील राज्य मंत्रिमंडळात काहीच दिवसांत पाहायला मिळतील असा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. ते आज पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी लक्ष्मण हाके म्हणाले की, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उशिरा का होईना छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान दिले त्याचा स्वागत आहे.ओबीसींच्या दृष्टिकोनातून छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळातील समावेश आवश्यक होता. मात्र ओबीसींचे आरक्षण आणि आरक्षणामधील घुसखोरी हे ओबीसी आणि ओबीसी नेत्यांसमोरील येत्या निवडणुकीमधील अडचणीचे प्रश्न आहेत. छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाने या लढाईला बळ मिळणार आहे. असं माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले. तसेच छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि जयंत पाटील या सगळ्यांना सदिच्छा आहे पण ओबीसींच्या प्रश्नांवर भूमिका घेणार नसाल तर गाठ ओबीसी चळवळीशी आहे हे लक्षात ठेवा असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

छगन भुजबळ तो झाकी है सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील अभी बाकी है! लक्ष्मण हाके स्पष्ट बोलले Read More »

Nilesh Lanke: अजित पवार गटात प्रवेश करणार? खासदर लंकेंनी स्पष्ट सांगितलं

Nilesh Lanke: राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचद्र पवार पक्षाचे खासदार अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात जोराने सुरू आहे. खासदार सुनील तटकरे यांनी खासदारांना संपर्क केला असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर आता खासदार निलेश लंके यांनी देखील या प्रकरणात प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माध्यमांशी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले की, पक्ष प्रवेशबद्दल चर्चा खोटी आहे. मी किंवा माझ्याबरोबर असलेल्या खासदारासोबत अशी चर्चा झाली नाही.आम्ही सर्वजण संसदेमध्ये आदरणीय सुप्रिया ताई सोबत काम करत आहोत. चर्चा फक्त माध्यमांमध्ये होत आहे. बीड प्रकरण डायव्हर्ट करण्यासाठी ही चर्चा असू शकते. असं निलेश लंके म्हणाले. तसेच आमचे खासदार संपर्क कोणाशी करणार नाही असं देखील ते म्हणाले. तर विधानसभेला पक्षाला जे अपयश आलं त्याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात आहेत आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेली अस्वस्थता व पक्ष संघटना कशी मजबूत करायची यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच पक्ष संघटनेतच्या नेतृत्वात बदल किंवा खांदेपालट असे संकेत दिले गेले नाहीत. सर्वांना सोबत घेऊन घराघरात पक्ष संघटनेचे पोहोचवण्याचा काम करण्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले असल्याचीही माहिती त्यांनी दिली. तर दुसरीकडे संतोष देशमुख प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणीही यावेळी त्यांनी केली. जर मुंडेंचा तो जवळचा कार्यकर्ता आहे. नैतिकता म्हणून त्यांनी आपली भूमिका अधिकृत केली पाहिजे. असं खासदार लंके म्हणाले. याच बरोबर महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका एकत्र लढवण्याचा प्रयत्न केला जाईल. अशी देखील माहिती त्यांनी दिली.

Nilesh Lanke: अजित पवार गटात प्रवेश करणार? खासदर लंकेंनी स्पष्ट सांगितलं Read More »