DNA मराठी

Raj Thackeray

raj thackeray

Raj Thackeray on Mohan Bhagwat : हिंमत असेल तर बळजबरीने ‘हिंदी’ लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा; राज ठाकरेंचे सरसंघचालक मोहन भागवतांना आव्हान

Raj Thackeray on Mohan Bhagwat : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरपोस्ट करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत हिंमत असेल तर बळजबरीने ‘हिंदी’ लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा असे आव्हान दिले आहे. एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी भाषेसाठी आग्रही राहण्याला ‘आजार’ असं संबोधले होते. यावर आता राज ठाकरे यांनी भागवतांना आव्हान देत प्रत्युत्तर दिले आहे. नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? राज ठाकरे यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे की, ८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईतल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी, भाषेबद्दल आग्रही राहणे, त्यासाठी वेळेस आंदोलन करणे हा एक आजार आहे अशा आशयाचं विधान केलं. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावण्यात आले होते, त्यातले काही हजर देखील होते ! परंतु मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती ! नाहीतर आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत? त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून प्रथम आपण बाहेर या ! असो . . . मुळात भाषावार प्रांतरचना या देशात का करावी लागली हा इतिहास भागवतांना निश्चितच माहीत असावा असे आम्ही समजतो ! भाषेबद्दलचं प्रेम, प्रांताबद्दलचं प्रेम हा जर भागवतांना आजार वाटत असेल तर त्यांच्या निदर्शनास हे आणून देऊ इच्छितो की हा आजार या देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये आहे. दक्षिणेत कर्नाटक ते तामिळनाडू इथे तीव्र भाषिक आणि प्रांतिक अस्मिता आहेत. तिकडे पश्चिम बंगाल असो, पंजाब असो अगदी गुजरात असो​, तिकडे पण ही भावना आहे. ही भावना नक्की काय आहे हे कधी भागवतांनी समजून घेतली आहे का? जेंव्हा देशातील ४ / ५ राज्यातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी वेगवेगळ्या राज्यात जातात, तिकडे आगाऊपणा करतात, तिथल्या स्थानिक संस्कृतीला नाकारून, तिथल्या भाषेचा अपमान करतात, स्वतःचे मतदारसंघ तयार करतात​, तेंव्हा स्थानिकांच्यात रोष तयार होतो आणि त्यातून उद्रेक तयार होतो. याला तुम्ही आजार म्हणणार? आणि जर तुमच्या लेखी हा आजार असेल तर तो आजार आपल्या गुजरातमध्ये पण पसरला आहे. गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या हजारो लोकांना जेंव्हा पळवून लावलं तेंव्हा तिकडे जाऊन समरसतेचे धडे का नाही दिलेत? असेच धडे कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश ते पंजाब ते पश्चिम बंगाल इथे जाऊन का नाही दिलेत ? मराठी माणूस सहनशील आहे पेक्षा इथले सत्ताधारी लिबलिबित कण्याचे आहेत म्हणून भागवतांची हिंमत होते. काही महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या तोंडावर भय्याजी जोशींनी मुंबईची भाषा ही फक्त मराठी नाही तर ती गुजराती पण आहे अशा आशयाचं विधान करत मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न केला. हे सगळं करून अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा कसा होईल हे पाहिलं. मुळात स्वतःला अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या भानगडीत मुळात पडायचंच कशाला? संघाच्या कामाबद्दल आमच्या मनात आदर आहे, पण म्हणून अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नये. आणि पडायचंच असेल तर देशभरात हिंदी (जी मुळात राष्ट्रभाषा नाही ) लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा आणि मग आम्हाला समरसतेच्या गोष्टी शिकवा आणि यात हिंदुत्व आणून आम्हाला ज्ञानामृत पाजायचा प्रयत्न करू नका. मी अनेकदा सांगितलं आहे की ज्या वेळेस हिंदूंवर हल्ला होईल तेंव्हा आम्ही हिंदू म्हणून आमच्याकडून जे काही करणं शक्य होईल ते आम्ही करूच ! रझा अकादमीच्या दंगलीविरोधात मोर्चा काढणारा आणि मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करणारा​, तसेच हिंदू सणांच्या वेळी मोठमोठ्याने लाऊडस्पीकर लावणे आणि मोठमोठ्याने डिजे लावून नागरिकांना त्रास होत असताना त्या विरोधात भूमिका घेणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच पक्ष होता. जे चूक ते चूकच हे आम्ही ठासून बोलतो. तसं मोहनराव आपण कधी बोलणार ? हिंदुत्वाच्या नावाखाली देशभरात जो धिंगाणा सुरु आहे , उत्तर भारतात कावड यात्रांमधे बिभत्स पद्धतीने महिलांना नाचवले जाणे , तसेच २०१४ ला बीफ एक्सपोर्ट मधे जो आपला देश ९ व्या क्रमांकावर होता तो आज दुसऱ्या क्रमांकावर आलाय आणि आपल्या देशात गोहत्येचं राजकारण करून जो तमाशा सुरू आहे आणि त्यातून माथी भडकवली जात आहेत त्यावर तुम्ही कधी बोलणार? त्या व्यापाऱ्यांच्या विरोधात सरकारला खडे बोल कधी सुनावणार? असो. तुम्ही काय करावं हे तुमच्यापाशी. आमच्यासाठी मराठी भाषा आणि मराठी माणूस हे अंतिम सर्वोच्च प्राधान्य आहे. या देशात भाषिक आणि प्रांतिक अस्मिता या राहणारच, तशाच त्या महाराष्ट्रात देखील राहणारंच ! हे आमचं स्वत्व आहे आणि त्याबद्दल जेव्हा जेव्हा असे प्रसंग उभे राहतील तेव्हा तेव्हा महाराष्ट्र त्वेषाने उभा राहील ! असं राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray on Mohan Bhagwat : हिंमत असेल तर बळजबरीने ‘हिंदी’ लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा; राज ठाकरेंचे सरसंघचालक मोहन भागवतांना आव्हान Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis on Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंकडून CM फडणवीसांची मिमिक्री अन् मुख्यमंत्र्यांनी दिला प्रत्युत्तर

Devendra Fadnavis on Aaditya Thackeray: संपुर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आता अंतिम टप्प्यात प्रचार आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभा घेत शिवसेना ठाकरे गट वर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या मिमिक्रीवर देखील प्रत्युत्तर दिले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, 15 जानेवारी रोजी होणारी निवडणूक ही ठाकरे बंधूंसाठी अस्तित्वाची लढाई आहे, मराठी लोकांसाठी नाही. तसेच फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांची मिमिक्री केल्याबद्दल टीका केली आणि म्हटले की त्यांचे काका राज ठाकरे हे एक चांगले मिमिक्री करणारे आहेत आणि म्हणूनच त्यांचा पक्ष सध्याच्या स्थितीत आहे. ठाकरे बंधूंच्या एकतेवर टीका शिवाजी पार्क येथे महायुती आघाडीच्या मेळाव्याला संबोधित करताना फडणवीस यांनी जुने व्हिडिओ दाखवले. या व्हिडिओंमध्ये उद्धव आणि राज ठाकरे एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत, तर आता 20 वर्षांनंतर ते हात मिळवताना दिसत आहेत. फडणवीस म्हणाले, “ही निवडणूक मुंबई किंवा मराठी लोकांसाठी नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई आहे.” त्यांनी विश्वास व्यक्त केला की महायुती बीएमसी जिंकेल. या रॅलीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले देखील उपस्थित होते. राज ठाकरे यांनी बीएमसी निवडणुकांचे वर्णन “मराठी माणसाची शेवटची निवडणूक” असे केले होते. फडणवीस यांनी असे उत्तर दिले की ठाकरे कुटुंबाची राजकीय विश्वासार्हता येथे पणाला लागली आहे. ते म्हणाले की मुंबई हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे आणि कोणीही त्याला वेगळे करू शकत नाही. फडणवीस यांनी मुंबईत महायुतीचा महापौर नियुक्त करण्याचे आणि पारदर्शक कारभार आणण्याचे आश्वासन दिले. शहराचा कायापालट करण्यासाठी महायुतीला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले. हिंदी आणि धारावीवरील हल्ला फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना म्हटले की, हिंदी सक्तीचा करण्याचा निर्णय याच सरकारने घेतला होता. धारावी पुनर्विकासाची निविदाही याच सरकारने रद्द केली होती. आता, अदानी समूह आणि राज्य सरकार संयुक्तपणे धारावीला आधुनिक टाउनशिपमध्ये रूपांतरित करत आहेत. भाषेच्या मुद्द्यावर त्यांनी स्पष्टपणे सांगितले की महाराष्ट्रात फक्त मराठी ही सक्तीची भाषा आहे.

Devendra Fadnavis on Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंकडून CM फडणवीसांची मिमिक्री अन् मुख्यमंत्र्यांनी दिला प्रत्युत्तर Read More »

mns

BMC Election : राज्यभाषा मराठी असताना गुजराती प्रचार का? मनसे आक्रमक

BMC Election: नवी मुंबईत भाजपच्या उमेदवारांकडून प्रचार पत्रके गुजराती भाषेतून वाटप करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रचार पत्रकाला मनसेने विरोध दर्शवला आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत भाजपवर टीका केली आहे. भाजपकडून मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा दिल्याचे सांगितले जाते, मात्र नवी मुंबईत त्यांचेच उमेदवार गुजराती भाषेचा वापर करून नेमकं कोणाला आकर्षित करत आहेत? असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. “हे प्रचार पत्रक मराठी भाषेत का वाटले गेले नाही? मराठी भाषेला पुन्हा एकदा दुय्यम दर्जा का दिला जातोय?” असा थेट प्रश्न गजानन काळे यांनी विचारला आहे. नवी मुंबई शहराची ओळख ही आगरी-कोळी भाषा आणि संस्कृतीची ओळख असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून निकाल 16 जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

BMC Election : राज्यभाषा मराठी असताना गुजराती प्रचार का? मनसे आक्रमक Read More »

maharashtra politics

Maharashtra Politics: अकोट नगरपालिकेत सत्तेसाठी भाजप – MIM अन् दोन्ही शिवसेना एकत्र

Maharashtra Politics : एकीकडे राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून 29 महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. तर दुसरीकडे नुकतंच अकोट पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे. अकोट येथे नुकतंच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपने 11 जागा जिंकले होते मात्र बहुमतपासून पक्ष दूर होता. तर आता अकोट नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या पुढाकाराने एक आघाडीची स्थापना करण्यात आली असून या आघाडीमध्ये एमआयएमला देखील स्थान देण्यात आल्याने विरोधकांकडून आता भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. भाजपने या आघाडीत एमआयएमसह शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला स्थान दिले आहे. तर वंचित आणि काँग्रेसला या आघाडीपासून दूर ठेवण्यात आले आहे. तर दुसरीकडे आता या आघाडीवर एमआयएम आणि भाजपच्या वरिष्ठांकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अकोट नगरपालिका एकूण जागा : 35 निकाल जाहीर : 33 (2 जागांची निवडणूक नंतर होणार) पक्षीय बलाबल : भाजप : 11 काँग्रेस : 6 शिंदेसेना : 1 उबाठा : 2 वंचित : 2 अजित पवार राष्ट्रवादी : 2 शरद पवार राष्ट्रवादी : 1 प्रहार : 3 एमआयएम : 5 भाजपच्या नेतृत्वात बनलेल्या ‘अकोट विकास मंचा’चे पक्षीय बलाबल : भाजप : 11 एमआयएम : 5 शिंदेसेना : 1 उबाठा : 2 अजित पवार राष्ट्रवादी : 2 शरद पवार राष्ट्रवादी : 1 प्रहार : 3

Maharashtra Politics: अकोट नगरपालिकेत सत्तेसाठी भाजप – MIM अन् दोन्ही शिवसेना एकत्र Read More »

thackeray

Raj Uddhav Thackeray Interview : राज्यकर्त्याचे प्रेम हे…, ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीचा टीझर प्रसिद्ध

Raj Uddhav Thackeray Interview : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली संयुक्त मुलाखत नुकतीच चित्रित झाली आहे. ही ‘दणदणीत आणि खणखणीत’ मुलाखत शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत आणि दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांनी घेतली. या मुलाखतीचा टीझर ‘सामना’च्या अधिकृत X हँडल (@SaamanaOnline) वर शेअर करण्यात आला आहे. टीझरमध्ये राज ठाकरे म्हणतात, “राज्यकर्त्याचे प्रेम हे राज्यावर असले पाहिजे, सत्तेवर असता कामा नये!” तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत ते म्हणाले की, त्यांनी भ्रष्टाचाराच्या गोष्टी करू नयेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मुलाखतीला विशेष महत्त्व आहे. मुलाखतीचा पहिला भाग गुरुवार, 8 जानेवारी 2026 रोजी ‘सामना’च्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर प्रसारित होणार आहे. ही संयुक्त मुलाखत ठाकरे बंधूंच्या राजकीय एकत्र येण्याचे प्रतीक मानली जात आहे, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलेय. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आल्याने तसेच भाजप – शिवसेना शिंदे गट युतीसह आणि काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवत असल्याने राजकीय समीकरणे बदलली आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Raj Uddhav Thackeray Interview : राज्यकर्त्याचे प्रेम हे…, ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीचा टीझर प्रसिद्ध Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis on Shivsena MNS Alliance : मी हिंदुत्ववादी, ठाकरे बंधू एकत्र पण फरक पडणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

Devendra Fadnavis on Shivsena MNS Alliance : राज्यातील राजकारणातील मोठी घडामोड घडली असून पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी युतीची घोषणा केल्यानंतर सत्ताधारी भाजपकडून देखील ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. तर दुसरीकडे या युतीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. फडणवीस म्हणाले, “शिया आणि युक्रेन एकत्र आल्यासारखे प्रचार केला जात आहे, झेलेन्स्की आणि पुतिन बोलत आहेत, त्यांचे अस्तित्व शोधणारे पक्ष, त्यांचे अस्तित्व गमावलेले पक्ष, ज्यांनी वारंवार भूमिका बदलून स्वतःबद्दल अविश्वास निर्माण केला आहे असे दोन पक्ष एकत्र आले तर काय फरक पडेल? हे दोन्ही पक्ष त्यांचे अस्तित्व वाचवण्यासाठी एकत्र आले आहेत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. महायुती बीएमसी निवडणुकीत जिंकेल पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, मुंबईच्या लोकांनी महायुती सरकारचा विकास पाहिला आहे. मुंबई आमच्यासोबत आहे, मुंबई आमच्यासोबत राहील आणि महायुती बीएमसी निवडणुकीत जिंकेल.” फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे हे खूप निराश व्यक्ती आहेत, म्हणून मला वाटते की त्यांच्या शब्दांना महत्त्व देऊ नये. तसेच मी हिंदुत्ववादी आहे संपूर्ण जगाला माहिती आहे असेही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 15 जानेवारी रोजी होणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीपूर्वी उद्धव आणि राज यांनी युतीची घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, दोन्ही पक्ष एकत्र राहण्यासाठी एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला (यूबीटी) फक्त 20 जागा मिळाल्या होत्या, तर मनसेला यश मिळाले नव्हते.

Devendra Fadnavis on Shivsena MNS Alliance : मी हिंदुत्ववादी, ठाकरे बंधू एकत्र पण फरक पडणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल Read More »

img 20251224 wa0027

Maharashtra Election : ठाकरे बंधू एकत्र अन् काँग्रेसचा मोठा निर्णय; ‘या’ पक्षासोबत आघाडी जाहीर

Maharashtra Election : शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महानगर पालिका निवडणुकीसाठी युती झाली असून महाविकास आघाडीमधील घटक पक्ष काँग्रेसने देखील मोठा निर्णय घेत महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षासोबत आघाडी जाहीर केली आहे. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक हर्षवर्धन सपकाळ यांनी माहिती दिली आहे. टिळक भवन येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यात आघाडीबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेत आघाडीची घोषणा केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महादेव जानकर हे बहुजन समाजाचा आश्वासक आवाज आहेत. देशात लोकशाही व संविधान पायदळी तुडवण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत आहे अशा प्रसंगी समविचारी पक्षांनी एकत्र येऊन लढण्याचा निर्णय झाला आहे. नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत आघाडीची औपचारिक घोषणा केलेली नव्हती पण सातारा, सांगली तसेच मराठवाडा व विदर्भात एकत्र निवडणुका लढलो आहोत आणि तीच भूमिका आज पुढे घेऊन जात आगामी काळात सोबत राहण्याचा निर्णय झाला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यावेळी म्हणाले की, शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार घेऊन काम करत असताना समविचारी पक्षांनी एकत्र असावे या भावनेतून लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती. काँग्रेसबरोबर रासपची आघाडी ३१ मे रोजीच झाली आहे. राहुल गांधी हे देशातील तरुण, महिला, आदिवासी, गोरगरीब, मागासवर्गीय यांचा आवाज बनून काम करत आहेत. जागा किती मिळणार यापेक्षा आजघडीला संविधान व लोकशाही वाचवण्याची नितांत गरज आहे तसेच सामान्य लोकांना मान सन्मान मिळाला पाहिजे, असे जानकर म्हणाले.. शिवसेना मनसे युतीला शुभेच्छा.. राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या युतीबद्दल विचारले असता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, त्यांच्या युतीला आमच्या सदिच्छा व शुभेच्छा आहेत, आम्ही जोडणारे आहोत तोडणारे नाही. विधानसभा व लोकसभा निवडणुकीत मविआ एकत्र लढली पण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, त्यानुसार पक्षाने निर्णय घेतला आणि प्रभारी रमेश चेन्नीथला यांनीही पक्षाची भूमिका जाहीर केलेली आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेले यश मोठं आहे. महायुतीने साम, दाम, दंड, भेद नितीचा खुलेआम वापर केला, सोबतीला प्रशासन व निवडणूक आयोग होता, तरीही काँग्रेस कार्यकर्ता निर्धाराने व निष्ठेने लढला. अनेक ठिकाणी स्वबळावर लढलो त्याचा फायदा काँग्रेसला नगरपालिका निवडणुकीत झाला, असेही सपकाळ म्हणाले. नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे ४१ नगराध्यक्ष निवडून आल्याबद्दल प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ४१ आकड्याच्या आकाराचा पुष्पगुच्छ काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना दिला.

Maharashtra Election : ठाकरे बंधू एकत्र अन् काँग्रेसचा मोठा निर्णय; ‘या’ पक्षासोबत आघाडी जाहीर Read More »

raj thackeray

Raj Thackeray on Tapovan Tree Case: साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात जमीन देऊ नका; तपोवन प्रकरणात राज ठाकरेंचा सरकारला इशारा

Raj Thackeray on Tapovan Tree Case: नाशिक येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारकडून आता मोठ्या प्रमाणात तयारी सुरू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे साधू- महंतांना राहण्यासाठी तपोवन परिसरात 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्यात येणार आहे. यासाठी या परिसरातील 1800 झाडे तोडण्यात येणार आहे. त्यामुळे आता स्थानिक नागरिकांनी याला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. तर आता या प्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील राज्य सरकारवर जोरदार टीका करत इशारा दिला आहे. साधूंच्या नावाखाली जमीन सपाट करुन उद्योगपतींच्या घशात घालण्याता सरकारचा डाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणात राज ठाकरे म्हणाले की, आगामी कुंभमेळ्यासाठी सरकारने 1800 झाडं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा हा काही पहिल्यांदा होत नाहीये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महापालिकेच्या सत्ताकाळात पण कुंभमेळा झाला. त्यावेळेला आम्ही भरपूर पायाभूत सुविधा उभारल्या. त्यावेळच्या नगरसेवकांचा आणि प्रशासनाचा उत्तम संवाद होता, त्यामुळे कामं करताना जनतेला काय हवं आहे याचा विचार केला गेला. एकूणच नियोजन इतकं उत्कृष्ट होतं की तेव्हाच्या महापौरांचा,नगरसेवकांचे प्रतिनिधी म्हणून आणि तत्कालीन आयुक्तांचा, प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून, थेट अमेरिकेत सत्कार झाला होता. आम्हाला या पायाभूत सुविधा उभ्या करताना कुठली झाडं तोडावी लागली नाहीत. मग आत्ता या कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागत आहेत ? बरं ही झाडं तोडून त्याची भरपाई म्हणून दुसरीकडे झाडं लावली जातील, असली पोकळ आश्वासनं सरकारने देऊच नयेत कारण असं कधी होत नाही. आणि सरकारकडे जर दुसरीकडे पाचपट झाडं लावायला जागा आहे तर मग तिकडेच साधुग्राम करा. सरकारने साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा संधिसाधूपणा करू नये. आणि काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारने काही वर्षांपूर्वी केली होती, जी झाडं कुठे दिसली नाहीत. असो. आज कुंभमेळ्याचं कारण दाखवून झाडं तोडायची, साधूंच्या नावाने ती जमीन सपाट करून घ्यायची आणि मग नंतर पुढे ती आपल्या लाडक्या उद्योगपतीला दान करायची ! इतकाच विचार या सरकारचा असणार ! नाहीतरी सध्या महाराष्ट्रात दुसरं काय सुरू आहे ? जमिनी गिळणं नाहीतर उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करणं हेच सध्या सत्ताधारी मंत्री, आमदार , त्यांचे नातेवाईक आणि त्यांची वर्तुळं करताना दिसतायत ! नाशिककरांचा या वृक्षतोडीला तीव्र विरोध आहे. नाशिकरांना माझं आवाहन आहे की तुम्ही ठाम रहा, तुमच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहील. यामध्ये खरतर कोणतेच राजकारण नाही , या आत्ता होणाऱ्या निवडणुकांनंतर देखील आमचा या वृक्षतोडीला विरोधच राहील ! माझं सरकारला आवाहन आहे की उगाच संघर्ष वाढवू नका. लोकांचं काय म्हणणं आहे त्याचा कधीतरी आदर राखला जाईल असं पहा. तरीपण सरकारने संघर्षाची भूमिका घेतली तर जनतेच्या बरोबर या लढ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहेच आणि असेलच!

Raj Thackeray on Tapovan Tree Case: साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात जमीन देऊ नका; तपोवन प्रकरणात राज ठाकरेंचा सरकारला इशारा Read More »

election

BMC Election: मुंबई महानगरपालिकेत तब्बल 11 लाख दुबार मतदार!; निवडणूक आयोगाचा खुलासा

BMC Election: राज्यात महानगरपालिकेच्या निवडणूका जाहीर होण्यापूर्वीच मुंबई महानगरपालिका देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या मतदारयादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार असल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला होता. मतदार याद्यांतील घोळ आणि प्रभागाच्या तोडफोडीवरून मनसे नेते बाळा नांदगावकर चांगलेच आक्रमक झालेत. मतदार यादीतील सगळ्या त्रुटी जोपर्यंत दूर होत नाही तोवर निवडणूक घेऊ नका. अशी मागणी देखील त्यांनी केली. एका मुंबई महानगरपालिकेत तब्बल 11 लाख दुबार मतदार आहेत. ज्या मतदारांची नावं तीन ते चार ठिकाणी नोंदवली गेलीत. आता निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण देत. मतदारयादीत त्रुटी असल्याचं मान्य केलंय. मतदारयाद्यांत 11 लाख दुबार मतदार असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिलीय. मतदारयादीत जी नाव दुबार आहेत अशी नाव हटवण्यासाठी महानगरपालिकेने निवडणूक आयोगाने वेळ मागितला असल्याची देखील माहिती आहे. त्याचप्रमाणे मतदारयादीत एकाच व्यक्तीच नाव हे एक-दोन नव्हे तर तर 103 वेळेस असल्याचं देखील महानगरपालिकेने सांगितलंय. गेल्या अनेक दिवसांपासून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेला दावा खरा ठरलाय. याबाबत त्यांच्याकडून निवडणूक आयोगाला पत्र देखील देण्यात आलं होतं. 4 लाख 33 मतदाराची नाव दुबार नोंदवली गेल्यानं हि संख्या 11 लाखांवर गेली. नोंदवल्या गेलेल्या बनावट मतदाराची इत्यंभूत माहिती नसल्यानं प्रशासन यासाठी विशेष मोहीम हाती घेणार आहे. 5 डिसेंबरपर्यंत हि मोहीम चारणारे असून निवडणूक वार्डांच्या माध्यमातून सहाय्यक आयुक्त ही मोहीम राबवणार आहेत.

BMC Election: मुंबई महानगरपालिकेत तब्बल 11 लाख दुबार मतदार!; निवडणूक आयोगाचा खुलासा Read More »

navneet rana

Navneet Rana : दुकानदारी चालवण्यासाठी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र; नवनीत राणा स्पष्टच म्हणाल्या

Navneet Rana : निवडणूक आयोगा विरोधात आज राज्यातील विरोधी पक्षांनी एकत्र येत मुंबईत सत्याचा मोर्चा काढत मतदार यादी दुरुस्त करण्याची मागणी केली. तर दुसरीकडे लोकसभेमध्ये तुम्ही जिंकले तेव्हा म्हटलं लोकशाही जिवंत आहे, विधानसभेमध्ये पराभूत झाले तर म्हणता लोकशाहीची हत्या झाली अशी टीका माध्यमांशी बोलताना माजी खासदार नवनीत राणा यांनी केली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे फक्त दुकानदारी चालवण्यासाठी एकत्र आले असल्याचा दावा देखील यावेळी नवनीत राणा यांनी केला. माध्यमांशी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे फक्त दुकानदारी चालवण्यासाठी एकत्र आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या सोबत येण्यापूर्वी राज ठाकरे म्हणायचे मज्जीद वरचे भोंगे काढा, हनुमान चालीसा म्हनायला लावत होते असं यावेळी नवनीत राणा म्हणाल्या. तसेच लोकसभेमध्ये तुम्ही जिंकले तेव्हा म्हटलं लोकशाही जिवंत आहे, विधानसभेमध्ये पराभूत झाले तर म्हणता लोकशाहीची हत्या झाली असं देखील यावेळी नवनीत राणा म्हणाल्या.

Navneet Rana : दुकानदारी चालवण्यासाठी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र; नवनीत राणा स्पष्टच म्हणाल्या Read More »