DNA मराठी

Pune rain

IMD Rain Alert: आज नगर जिल्ह्यात धो धो पाऊस, हवामान खात्याचा यलो अलर्ट; नगरकरांना दक्षतेचे आवाहन

IMD Rain Alert – अहिल्यानगरसह राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून आज १९ ऑगस्ट रोजी देखील नगर जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याने जिल्ह्यासाठी “यलो अलर्ट” जारी करण्यात आला असून नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आज जिल्ह्यात वीजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज वर्तविला आहे. भिमा नदी (दौंड पूल) -३०४४ क्युसेक, सीना नदी (सीना धरण) २६९ क्युसेकने विसर्ग सुरु आहे. पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पाऊस झाल्यास भिमा, प्रवरा, गोदावरी, घोड, सीना तसेच मुळा धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे नद्यांची पाणीपातळी वाढू शकते. मुळा नदीपात्रातील कोतूळ येथून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना पुढील दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे मेघगर्जना, वीजा किंवा वादळी वाऱ्याच्या वेळी झाडाखाली किंवा त्याजवळ थांबू नये, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. वादळादरम्यान विद्युत उपकरणे वापरू नयेत व वीजेच्या सुवाहक भागांपासून दूर राहावे. मोकळे मैदान, टॉवर, विद्युत खांब, धातूची कुंपणे, लटकणाऱ्या केबल्स यांपासून दूर राहावे. जाहिरात फलकांच्या आसपास थांबू नये. मोकळ्या जागी असल्यास गुडघ्यावर बसून डोके व कान झाकावे. धरण व नदी परिसरात पर्यटनासाठी जाऊ नये, पाण्यात उतरू नये व धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. नदी, ओढा, नाले काठावरील नागरिकांनी पाणीपातळी वाढल्यास त्वरित सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, पाण्यावरून वाहणारे पूल ओलांडू नयेत. मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये थांबू नये. अतिवृष्टीमुळे भूस्खलनाची शक्यता असल्याने डोंगरपायथ्याशी राहणाऱ्यांनी वेळीच स्थलांतर करावे, घाटरस्त्याने प्रवास टाळावा. शेतीमाल व जनावरांचे संरक्षण करण्यासाठी योग्य नियोजन करावे. आपत्कालीन परिस्थितीत नजीकच्या पोलीस ठाणे किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. जिल्हा नियंत्रण कक्ष – दूरध्वनी क्रमांक १०७७ (टोल फ्री), ०२४१-२३२३८४४, २३५६९४० उपलब्ध आहेत.

IMD Rain Alert: आज नगर जिल्ह्यात धो धो पाऊस, हवामान खात्याचा यलो अलर्ट; नगरकरांना दक्षतेचे आवाहन Read More »

आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट, पुण्यात पूरसदृश परिस्थिती; जाणून घ्या ताजे अपडेट

Pune Rain Alert: रविवारी संपूर्ण महाराष्ट्रात मुसरधार पावसाने हजेरी लावली. रविवारी पुणे जिल्ह्यातील बारामती आणि इंदापूर तालुक्यात मुसळधार पाऊस पडला आहे. पुण्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूकही विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मदत आणि बचाव कार्य त्वरित सुरू करण्यात आले ज्यासाठी एनडीआरएफ टीम तैनात करण्यात आली. मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी भारतीय हवामान खात्याने आज पुण्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. अनेक नाले आणि नद्या दुथडी भरून वाहत आहेत, ज्यामुळे घरांमध्ये पाणी शिरले आहे आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत. लोक त्यांच्या घरात अडकले आहेत आणि प्रशासन मदत कार्यात व्यस्त आहे. बारामतीत 150 घरांमध्ये पाणी जिल्हा अधिकाऱ्यांच्या मते, इंदापूरमधील सुमारे 70 वस्त्यांमध्ये आणि बारामतीतील सुमारे 150 घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. बारामतीमध्ये 19 घरांचे अंशतः नुकसान झाले. घरात पाणी साचल्याने एकाच कुटुंबातील सात जण अडकले.

आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट, पुण्यात पूरसदृश परिस्थिती; जाणून घ्या ताजे अपडेट Read More »

पुन्हा धो धो…, अहिल्यागरसह या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा इशारा

IMD Rain Alert: गेल्या काही दिवसांपासून जवळ्पास संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या अवकाळी पावसामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना देखील अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. अनेक तालुक्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे. तर आता पुढील काही दिवस अवकाळी पाऊस सुरूच राहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कमी दाबाचे क्षेत्र कोकणाजवळ सक्रिय असल्याने 23 मे रोजी रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, कोल्हापूर, नगर, नाशिक या जिह्यांमध्ये अनेक ठिकाणी संततधार पावसासह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी सर्तक रहावे असे आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या अवकाळी पावसामुळे पुणे, अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजी नगर मधील नागरिकांना मोठा फटका बसला आहे. याच बरोबर शेतकऱ्यांचे देखील नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

पुन्हा धो धो…, अहिल्यागरसह या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा इशारा Read More »