DNA मराठी

Pune News

mahesh landge

Mahesh Landge : अजितदादांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये ‘अजित सृष्टी’ उभारा; आमदार महेश लांडगे

Mahesh Landge : महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे लोकनेते, उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात भव्य स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी भाजप आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. यासाठी त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देखील दिले आहे. या निवेदनात महेश लांडगे म्हणाले की, ”दिवंगत अजितदादांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवड शहरात ‘अजित सृष्टी’ उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे. यासंदर्भात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाला तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नवनिर्वाचित नगरसेवकांच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत या प्रस्तावास मंजुरी देण्यात येणार आहे. “पिंपरी-चिंचवड शहर देशातील क्रमांक एकचे शहर बनवण्याचे दिवंगत अजितदादांचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.” ‘अजित सृष्टी’च्या माध्यमातून अजितदादांची विकासदृष्टी, लोककल्याणाची भावना आणि शहराच्या प्रगतीसाठीचे योगदान पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.” अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या सर्वांगीन विकासाला गती दिली. पायाभूत सुविधा, नागरी सेवा, प्रशासकीय निर्णयक्षमता आणि विकासाभिमुख धोरणांमुळे महाराष्ट्राला वेगळी ओळख मिळाली. असे नेतृत्व अकाली काळाच्या पडद्याआड जाणे ही राज्याची मोठी हानी आहे, त्यांच्या कार्याची जपणूक होणे ही गरज आहे. त्यामुळे नवनिर्वाचित नगरसेवकांच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत अजितदादांच्या स्मारकाचा प्रस्ताव मंजूर करून शहरवासी यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात यावी, यासाठी आम्ही आग्रही आहोत. तत्पूर्वी जुन्या महापालिका सभागृहात अजितदादांचे तैलचित्र तातडीने बसवण्यात यावे, अशी सूचना प्रशासनाला केली आहे, असल्याचे लांडगे यांनी सांगितले. नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात उभारण्यात येणारे स्मारक, सभागृहाला दिले जाणारे त्यांचे नाव आणि ‘अजित सृष्टी’ ही संकल्पना भविष्यातील पिढ्यांना लोकसेवेची प्रेरणा देत राहील. याबाबत महापालिका प्रशासन सकारात्मक निर्णय घेईल, असा मला पूर्ण विश्वास आहे. त्यासाठी आम्ही सर्वोतोपरी पाठपुरावा करणार आहोत, असे आमदार लांडगे म्हणाले.

Mahesh Landge : अजितदादांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये ‘अजित सृष्टी’ उभारा; आमदार महेश लांडगे Read More »

ganesh bidkar

Pune Election: भाजप उमेदवार गणेश बिडकर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल…

Pune Election : भाजपचे उमेदवार गणेश बिडकर यांच्या अंगावर धावून जात मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंगावर धावून जात शिवीगाळ केल्याचा आरोप असून निनाद धेंडे, संजय भिमाले, प्रदीप कांबळे, भरत शिंदे आणि सागर कांबळे अशी आरोपींची नावे आहेत. हा प्रकार 10 जानेवारी रोजी सायंकाळी मंगळवार पेठेतील सदानंद नगर परिसरात घडला. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आदित्य दीपक कांबळे (वय 24) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे मित्र भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निलेश आल्हाट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मंगळवार पेठेत थांबले होते. याचवेळी भाजप आणि आरपीआयचे कार्यकर्तेही शुभेच्छा देण्यासाठी आल्याने परिसरात गर्दी झाली. या गर्दीचा फायदा घेत आरोपींनी प्रभाग क्रमांक 24 मधील भाजपच्या सर्व उमेदवारांना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. तसेच आरोपी सागर कांबळे याने गणेश बिडकर यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला, असे तक्रारीत नमूद आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.

Pune Election: भाजप उमेदवार गणेश बिडकर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल… Read More »

chandrkant patil

Chandrkant Patil on Ajit Pawar: मोफत प्रवासाची घोषणा फसवी; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांवर थेट वार

Chandrkant Patil on Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिरनाम्यात पीएमपीएमएल आणि मेट्रोमध्ये मोफत प्रवास करण्याची केलेली घोषणा फसवी असून, ती राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वासात न घेता केली आहे. ही घोषणा स्वागताहार्य जरी असली तरी ती राज्य सरकारशिवाय अमलात येऊ शकत नाही. अजित पवार यांना एकट्याने ही घोषणा जाहीर करण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केला.पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, अमोल कविटकर आणि पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते. पाटील म्हणाले, बिहार निवडणुकीत काँग्रेसने अशा अनेक फसव्या घोषणा केल्या होत्या. मात्र, सरकारच येणार नसल्याचे माहीत असल्याने अशा घोषणा करण्यात आल्या. अजित पवार यांनाही महापालिकेत आपली सत्ता येणार नसल्याचे माहीत असल्याने अशा घोषणा करण्यात येत आहेत. ‘ही योजना चांगली असली तरी तिची अंमलबजावणी करण्यासाठी महायुती सरकारला हा एकत्रित निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे केवळ क्रेडिट घेण्यासाठी पवार यांनी आपल्या मित्र पक्षांना विश्वासात न घेता अशा घोषणा करू नये, पाटील म्हणाले. यापूर्वी 1999 ला अजित पवार यांनी मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. सरकार आल्यानंतर ती प्रिंटिंग मिस्टेक असल्याचा बचाव त्यांनी केला होता. असाच प्रकार या घोषणेबाबतही होण्याची दाट शक्यता आहे,’ असा चिमटाही पाटील यांनी काढला. मुख्यमंत्रीपदाकडे संपूर्ण राज्याचे अधिकार असतात. केवळ एक बटण दाबून मोफत बस योजना लागू होऊ शकत नाही. महायुती हे तिघांचे सरकार असून कोणताही एक नेता स्वतंत्रपणे अशा प्रकारच्या घोषणा करू शकत नाही. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हमीपत्र जाहीर केले असून घोषणापत्रावरून त्यांचा प्रवास हमीपत्राकडे आला आहे, कारण अनेक घोषणा पूर्ण करणे त्यांना शक्य नसल्याचा आरोप पाटील यांनी केला. मेट्रो आणि पीएमपीएमएल बसमध्ये मोफत प्रवास देण्याची घोषणा करताना त्यामागील प्रक्रिया, आर्थिक तरतूद आणि अंमलबजावणी याबाबत कोणतेही स्पष्ट उत्तर देण्यात आलेले नाही, अशी टीका त्यांनी केली. पीएमपीएमएल बससेवा सध्या तोट्यात असून, पुण्याचा पालकमंत्री असताना बससेवेचा सुमारे एक हजार कोटी रुपयांचा तोटा होता, अशी आठवण त्यांनी करून दिली. अद्याप एमएनजीएलचे 65 कोटी रुपये मनपाकडे थकीत असताना मोफत बस योजना कशी राबवणार? त्यासाठी राज्य सरकारच्या मदतीची आवश्यकता असून हा निर्णय महायुती सरकारला घ्यावा लागेल, असेही ते म्हणाले. महिलांना उच्च शिक्षणासाठी 50 टक्के शुल्क माफीचा निर्णय घेण्यासाठी अजित पवार यांनी सहा महिने लावले होते. राज्याच्या तिजोरीवर ताण येत असल्याची त्यांची भूमिका होती. अखेरीस तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाम भूमिका घेतल्यानंतर तो निर्णय घेण्यात आला. अशी भूमिका अजित पवार हे केवळ महापालिका निवडणुकीच्या तोंडावर करत असलेल्या घोषणा आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत, असे ही पाटील म्हणाले. दरम्यान, पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपला अंतर्गत सर्व्हेनुसार सध्या 115 जागा मिळत असून भाजपा प्रदेशाध्यक्ष यांच्या मायक्रो प्लॅनिंगमुळे हा आकडा 125 पर्यंत जाईल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. निवडणुकीनंतर पुण्यात भाजपचाच महापौर होईल आणि त्या पदासाठीची विविध प्रवर्गानुसार नावेही अंतिम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Chandrkant Patil on Ajit Pawar: मोफत प्रवासाची घोषणा फसवी; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांवर थेट वार Read More »

suresh kalmadi

Suresh Kalmadi passed away : माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचं निधन

Suresh Kalmadi  passed away  : माजी केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं वयाच्या 82 व्या वर्षी पुण्यातील राहत्या घरी निधन झालं आहे. त्यांनी अगदी कमी वेळेत पुण्यातील राजकारणा आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. सुरेश कलमाडी काही काळापासून ते आजाराशी झुंज देत होते. कोण होते सुरेश कलमाडी ? सुरेश कलमाडी यांचा जन्म 1 मे 1944 रोजी झाला. त्यांनी पुण्यातील सेंट व्हिन्सेंट हायस्कूलमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. 1960 साली त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण सुरू केले. त्यानंतर 1964 मध्ये हवाई दलाच्या प्रशिक्षणासाठी ते जोधपूर येथील फ्लाइंग कॉलेजमध्ये दाखल झाले. 1964 ते 1972 या कालावधीत त्यांनी भारतीय हवाई दलात सेवा बजावली. राजकीय कारकिर्दीची सुरुवात करत 1978 मध्ये ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनले. अवघ्या 38 व्या वर्षी, 1982 मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकत खासदार म्हणून प्रवेश केला. त्यानंतर जवळपास तीन दशके त्यांनी संसदेत पुण्याचे प्रतिनिधित्व केले. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी रेल्वेमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. 2010 नंतर मात्र त्यांच्या राजकीय वाटचालीला उतरती कळा लागली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर आरोप झाले. या प्रकरणामुळे त्यांना मोठ्या राजकीय विरोधाला सामोरे जावे लागले तसेच सुमारे नऊ महिने कारावासही भोगावा लागला.

Suresh Kalmadi passed away : माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचं निधन Read More »

oplus 16908288

Pimpri-Chinchwad Municipal Corporation Elections : भाजपसाठी आनंदाची बातमी; पिंपरी-चिंचवडमध्ये दुसरा नगरसेवक बिनविरोध

Pimpri-Chinchwad Municipal Corporation Elections : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये वार्ड 10 मधील भाजपाच्या उमेदवार सुप्रिया चांदगुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्षा भालेराव होत्या त्यांनी माघार घेतल्यामुळे चांदगुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या आधी भोसरीतील धावडेवस्ती प्रभाग क्रमांक 6 मध्ये भाजपने माजी नगरसेवक रवी लांडगे बिनविरोध झाले आहे. प्रभाग 6 मध्ये अपक्ष उमेदवार प्रसाद काटे यांचा अर्ज छाननीदरम्यान बाद ठरवण्यात आला. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार निलेश सूर्यवंशी यांचा अर्ज जात प्रमाणपत्र सादर न केल्याने नामंजूर करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने संतोष काळुराम लांडगे यांना उमेदवारी जाहीर केली होती, मात्र त्यांचा अर्जच दाखल न झाल्याने ते निवडणूक रिंगणाबाहेर राहिले होते. यामुळे प्रभाग क्रमांक 6 मध्ये रवी लांडगे बिनविरोध झाले. विशेष म्हणजे, 2017 च्या महापालिका निवडणुकीतही रवी लांडगे यांची बिनविरोध निवड झाली होती.

Pimpri-Chinchwad Municipal Corporation Elections : भाजपसाठी आनंदाची बातमी; पिंपरी-चिंचवडमध्ये दुसरा नगरसेवक बिनविरोध Read More »

pune crime

Maharashtra Crime News : मोठी कारवाई, पबवर धाड अन् 3.67 लाखांचा मुद्देमाल जप्त ; 50 जण ताब्यात

Maharashtra Crime News : पुण्यातील विमाननगर परिसरातील ‘द नॉयर’ (रेड जंगल) पबमध्ये बेकायदा सुरू असलेल्या पार्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी पहाटे मोठी कारवाई केलीये. या कारवाईमध्ये महिला व पुरुष मिळून 50 जणांना ताब्यात घेण्यात आले असून पब मालकासह 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलायं. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे अधीक्षक अतुल कानडे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. छाप्यात सुमारे 3 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये 178 विदेशी मद्याच्या बाटल्या तसेच अवैध मद्यव्यवसायासाठी वापरलेले साहित्य खुर्चा, सोफा, लाकडी टी-पॉय, लोखंडी लोखंडी साहित्य, स्पीकर्स, साऊंड सिस्टम, लॅपटॉप, संगणक, काचेचे ग्लास, फॉग मशीन आदींचा समावेश आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात बेकायदा पार्थ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी 21 भरारी पथके तैनात करण्यात आली असल्याची माहिती अधीक्षक कानडे यांनी दिली. या प्रकरणात एकूण 52 आरोपींवर कारवाई करण्यात आली असून पब चालक व व्यवस्थापक असे दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

Maharashtra Crime News : मोठी कारवाई, पबवर धाड अन् 3.67 लाखांचा मुद्देमाल जप्त ; 50 जण ताब्यात Read More »

chandrashekhar bawankule

Chandrashekhar Bawankule: उत्खनन गैरव्यवहार प्रकरण, चार तहसीलदारांसह दहा जण निलंबित

Chandrashekhar Bawankule : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा निर्णय घेत पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वनीकरणासाठी राखीव असलेल्या क्षेत्रात झालेल्या 90 हजार ब्रास अनधिकृत गौण खनिज उत्खननाप्रकरणी दोषी आढळलेल्या चार तहसीलदार, चार मंडल अधिकारी आणि दोन तलाठी अशा नऊ जणांचे निलंबन करण्यात आले. परवानगीपेक्षा ९० हजार ब्रास अधिक उत्खनन झाल्याचे ईटीएस मोजणीत निष्पन्न झाले असून, यावर फौजदारी व महसूली अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. आमदार सुनील शेळके यांनी मावळ येथील उत्खनन गैरव्यवहाराबाबत आज विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. उत्खनन प्रकरणात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली असून, अधिकारी आठ महिने टाळाटाळ करत अनधिकृत उत्खनन करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप शेळके यांनी केला होता. विभागीय आयुक्तांच्या चौकशीत निष्पन्न महसूल मंत्र्यांनी सांगितले की, विभागीय आयुक्तांनी दोनदा चौकशी केली. गट क्रमांक ३६, ३७, आणि ३८ मध्ये खाणपट्टे मंजूर होते, मात्र ३५, ४१, ४२, आणि ४६ या गट क्रमांकांवरही गौण खनिजाचे तात्पुरत्या स्वरूपाचे उत्खनन झाले आहे. परवानगीपेक्षा जादा उत्खनन ईटीएस मोजणीमध्ये ३ लाख ६३ हजार ब्रासची परवानगी असताना तब्बल ४ लाख ५४ हजार ब्रास उत्खनन झाल्याचे आढळले. म्हणजेच, ९० हजार ब्रास जास्तीचे उत्खनन झाले आहे. निलंबित अधिकाऱ्यांची नावे गैरव्यवहारात कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तलाठी (२): दीपाली सनगर आणि गजानन सोटपल्लीवार. मंडळ अधिकारी (४): संदीप बोरकर, माणिक साबळे, अजय सोनवणे आणि रमेश कदम. तहसीलदार (४): जोगेंद्र कटियार, मनजीत देसाई, मधुसूदन बारगे, विक्रम देशमुख. (या काळात कार्यरत असलेले चार तहसीलदार.) दंड आणि महसूली कारवाई ९० हजार ब्रास जादा उत्खननासाठी संबंधितांवर गुन्हा दाखल करणे, दंड आकारणी करणे, सातबारा उताऱ्यावर नोंदी घेणे आणि दंड न भरल्यास व्याजासह वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विभागीय चौकशी निलंबित अधिकाऱ्यांची तीन महिन्यांत विभागीय चौकशी पूर्ण करून त्याचा अहवाल आगामी अधिवेशनात पटलावर ठेवला जाईल, असे महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले.

Chandrashekhar Bawankule: उत्खनन गैरव्यवहार प्रकरण, चार तहसीलदारांसह दहा जण निलंबित Read More »

sahyadri hospital

Sahyadri Hospital Case : सह्याद्री रुग्णालयाची तोडफोड प्रकरण; सात जणांवर गुन्हा दाखल

Sahyadri Hospital Case : पुण्यातील हडपसरमधील सह्याद्री रुग्णालयात उपचारादरम्यान ज्येष्ठाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची 10 डिसेंबर रोजी तोडफोड केल्याची धक्कादाय घटना घडली होती. या घटनेनंतर पुणे पोलिसांनी कारवाई करत सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. डॉक्टरांनी ट्रीटमेंट व्यवस्थित केली नाही, त्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत ही तोडफोड करण्यात आली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले होते. तर आता या प्रकरणात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात शुभम सकपाळ, गौरव सकपाळ, विश्वजीत कुमावत, कुणाल सकपाळ यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sahyadri Hospital Case : सह्याद्री रुग्णालयाची तोडफोड प्रकरण; सात जणांवर गुन्हा दाखल Read More »

pune crime

Maharashtra Crime: मद्यार्क चोरी प्रकरण, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; 1 कोटी किमतीचा मुद्देमाल जप्त

Maharashtra Crime : राज्य उत्पादन शुल्क विभाग, विभागीय भरारी पथक, पुणे यांनी सापळा रचून टँकरद्वारे मद्यार्काची चोरी व तस्करी करणाऱ्यांवर मोठी कारवाई करत दोन टँकरांसह एकूण रुपये 1 कोटी 19 लाख 4 हजार 500 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई 25 नोव्हेंबर रोजी भोर तालुका, निगडे गाव हद्दीतील सातारा–पुणे महामार्गावर हॉटेल चौधरी पॅलेस, राजस्थानी प्युअर व्हेज मागील मोकळ्या जागेत करण्यात आली. मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचला असता, अशोक लेलॅण्ड कंपनीचे 16 चाकी टँकर क्र. एमएच-12 वायबी-9186 मधून 39,800 लि. मद्यार्क व एमएच-12 युएम-9887 मधून 39,800 लि. मद्यार्क हे दोन्ही टँकर संशयास्पदरीत्या थांबले व चालकांनी प्लास्टिक पाईपद्वारे मद्यार्क बाहेर काढण्यास सुरुवात केली. पथकाने तत्काळ छापा टाकताच आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. योवळी 200 लिटर क्षमतेचे दोन ड्रम – प्रत्येकी 180 लि. मद्यार्क, 35 लिटर कॅन – 35 लि. मद्यार्क, 20 लिटर प्लास्टिक बादली – 20 लि. मद्यार्क, रिकामे ड्रम, कॅन, पाईप, नरसाळे, पक्कड इत्यादी साहित्य असे 79 हजार 600 साहित्यासह एकूण रुपये 1 कोटी 19 लाख 4 हजार 500 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन्ही टँकर चालक, टँकर मालक, संबंधित आसवणी व्यवस्थापक तसेच ज्ञात/अज्ञात आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 कलम 65(अ)(ई), 67, 81, 83, 90 व 103 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

Maharashtra Crime: मद्यार्क चोरी प्रकरण, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; 1 कोटी किमतीचा मुद्देमाल जप्त Read More »

pune crime

Pune News: भाऊ म्हणून घरात प्रवेश दिलं अन् तरुणावर अत्याचार; पुण्यात महिलेवर गुन्हा दाखल

Pune News : राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या गुन्हांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. पुणे शहरात देखील महिलांवर अत्याचारासारखे घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर दुसरीकडे आता पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका महिलेने पुरुषावर गुंगी आणणारे औषध देऊन त्याच्यावर अत्याचार केल्या असल्याची घटना घडली आहे. याबाबत कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, चंदगड तालुक्यातील 47 वर्षीय व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी महिलेवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारीनुसार, पीडित तरुणाची ओळख तुळजापूर येथे देवदर्शनादरम्यान आरोपी महिलेशी झाली. सुरुवातीला ‘भाऊ’ म्हणून तिने पीडित तरुणाच्या कुटुंबाशीही जवळीक वाढवली. पुढे वारंवार संपर्क साधत ती त्यांच्या घरात येऊन राहू लागली. घरात राहत असताना त्या महिलेकडून पीडिताशी जवळीक साधण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यास विरोध केल्यानंतर पीडिताने तिला घर सोडण्यास सांगितले. नंतर माफी मागत ती महिलेला चंदगडसाठी निघाली मात्र बसस्थानकात आल्यानंतर सोडण्यासाठी गेलेल्या तरुणाला म्हणाली की मला वॉशरुमला जायचे आहे. तसेच मी उघड्यावर जात नाही म्हणत ती एका लॉजवर गेली आणि तरुणालाही आत बोलावून स्वतःला उच्च न्यायालयातील वकील असल्याचे सांगत तुम्हाला मदत करेन तुमच्या मुलाला मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या ओळखीने नोकरीला लावले असे सांगत त्याच्यावर मानसिक दबाव टाकला मात्र तो रागाने निघून गेला. काही दिवसांनी पुन्हा तिने पीडिताच्या पत्नीला फोन करून त्याला ‘काशी दर्शनासाठी भाऊ म्हणून’ सोबत घेऊन जाते असे सांगून त्याला 25 फेब्रुवारी रोजी पुण्यात बोलावले. तक्रारीनुसार, कोथरूडमधील तिच्या घरी तरुणाला काहीतरी प्यायला दिले त्यानंतर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाला. विरोध केल्यावर धमकी देण्यात आली मी म्हणेल तसेच करायचे नाहीतर इथेच काहीतरी करेन असे तक्रारीत म्हटले आहे. पुढे मला काशीला नेले त्यांनतर काशीत तीन दिवस बळजबरीने ठेवत शरीरसंबंधांसाठी दबाव टाकल्याचा आरोप पीडिताने केला आहे. पत्नीशी संपर्क झाल्यानंतर तिने या महिलेला फोनवर सुनावले, त्यानंतर काही दिवस फोन आला नाही मात्र त्यानंतर आरोपी महिलेकडून दोन लाख रुपयांची मागणी व फोटो व्हायरल करण्याची धमकी आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे कोथरूड परिसरात आणि शहरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Pune News: भाऊ म्हणून घरात प्रवेश दिलं अन् तरुणावर अत्याचार; पुण्यात महिलेवर गुन्हा दाखल Read More »