DNA मराठी

Nilesh Lanke

Ahmednagar News: पारनेरमधील जनता निलेश लंकेवर नाराज : राहुल शिंदे

Ahmednagar News: महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी आमदार असताना तालुक्याच्या कुठल्याही प्रश्नांची सोडवणूक केली नाही. केवळ दहशतीला खतपाणी घालण्याचे काम त्यांनी आपल्या बगल बच्च्यांमार्फत केले. यामुळे मतदार संघातील जनता त्यांना कोणताही थारा देणार नाही असा घणाघात पारनेरचे भाजप तालुका अध्यक्ष राहुल शिंदे यांनी केला. त्यात त्यांनी केवळ उमेदवारीसाठी अजित पवारांशी केलेल्या गद्दारीमुळे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज आहेत असेही शिंदे म्हणाले.  लंके आपल्या आमदारकीच्या काळात केवळ आश्वासने दिली. प्रशासनाला वेठीस धरून केवळ आपल्या आसपासच्या लोकांचा त्यांनी उद्धार केला. कोणतीही ठोस कामे त्यांनी केली नसल्याने मतदारांचा कौल महायुतीच्या उमेदवाराकडे असल्याचे राहूल शिंदे यांनी सांगितले.    पारनेरचे आमदार निलेश लंके हे कोविड काळात केलेल्या नौटंकीचा पर्दाफाश आता झाला आहे. सरकारचे अनुदान घेऊन कोवीड सेंटरच्या माध्यमातून श्रेय लाटण्याचे काम त्यांनी केले. एकीकडे जनता कोविड संकटाने त्रस्त झाली असताना लंके मात्र या संकटातून स्वताला प्रसिद्धी मिळविण्यात दंग होते. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. ही बाब  मतदार संघातील जनतेला रुचलेली नाही.   त्या कोवीड रुग्णालयाचे सत्य माध्यमांनी समोर आल्याने लोकांच्या मनात लंके यांच्या विरोधात प्रचंड चिड निर्माण झाली आहे.  आधीच लोकांनी त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत उतरू नये असे सांगत   असताना लंके यांनी केवळ लोकसभेच्या उमेदवारीसाठी अजितदादांची साथ सोडली सहा महिन्यात त्यांनी अजित पवारांशी गद्दारी केली. यामुळे मतदार संघातील लोकांचा विश्वास कसा संपादन करतील? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.   तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार यांनी कोविड काळात आपल्या रुग्णालयात लोकांची मोफत सेवा केली. त्याचबरोबर जिल्हाभर आरोग्य शिबीरे राबऊन लोकांना सहकार्य केले. तसेच जिल्ह्यात ऑक्सिजन आणि रेमिडिअरचा तुटवडा असताना त्यांनी जिल्ह्यात शर्तीचे प्रयत्न करत हा पुरवठा कायम ठेवला. पण याची कुठेही प्रसिद्धी केली नाही. कोणता पुरस्कार मिळावा यासाठी आटापिटा केला नाही. या सर्व सेवाभावी कार्याची सहानभूती डॉ. सुजय विखे पाटील यांना निश्चित मिळेल असा विश्वास यांनी व्यक्त केला.

Ahmednagar News: पारनेरमधील जनता निलेश लंकेवर नाराज : राहुल शिंदे Read More »

Lok Sabha Election 2024 : ‘ते’ आपल्याला जमत नाही, विखेंचा लंकेंना टोला

Lok Sabha Election 2024 : भावनांशी खेळून मत मागणे आपल्याला जमत नाही.डॉक्टर या नात्याने रूग्णांना सेवा देतानाचे व्हिडीओ काढणे आपल्याला पसंत नाही.केलेल्या विकास कामांवर आपण मतदान मागत आहोत. कोणतेही सर्व्हे येवू द्या,मात्र मला विजयी करण्याचा सर्व्हे गरीबांच्या मनात ठामपणे असल्याचा विश्वास महायुतीचे उमेदवार खा डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त  केला. पारनेर तालुक्यात आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खा.विखे पाटील बोलत याप्रसंगी भाजपाचे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे प्रा.विश्वनाथ कोरडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत गायकवाड, सोनाली चालके, बंडू रोहकले, बाबासाहेब खिलारी, सचिन वराळ, रवींद्र पूजारी, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात खा.विखे पाटील म्हणाले की,लोकसभा निवडणुक ही देशाची आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडून भारतीय जनता पक्ष मतदान मागत आहे.मागच्या पाच वर्षात केंद्र सरकारच्या माध्यमातून योजनाचा लाभ सामान्य माणसापर्यत पोहचवला.जे  प्रामाणिकपणे केले तेच आपण लोकांमध्ये जावून सांगत आहोत.इतरांसारखी खोटी सहानुभूती आपल्याला मिळवायची नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोव्हीड संकटात डॉक्टर नात्याने आपणही हजारो रुग्णांची सेवा केली.पण समोर रूग्ण मरणांशी झुंज देत असताना त्याच्यावर उपचार करतानाचे व्हीडीओ टाकण्याचा मोह आपल्याला कधी झाला नाही आणि होणारही नाही असे सांगून डुप्लीकेट व्हिडीओ करून राजकारण करण्याची पध्दत आमची नाही.विखे पाटील परीवार लोकंमध्ये जावून काम करतो.या जिल्ह्यातील लोकांच्या सुख दुखात सहभागी होवून लोकांचे पाठबळ मिळवतो.प्रेमाच्या आणि जीवाभावाच्या लोकांमुळेच विखे परीवाराला राजकारणात अनेक वर्ष संधी मिळाली.त्यामुळे आमचा सर्वे लोकांच्या मनात आहे.कोणाचेही सर्वे येवू द्यात अहिल्यानगर मतदार संघातून महायुतीचाच विजय होणार आणि पारनेर तालुक्यातून सर्वाधिक मतांची आघाडी मिळणार असल्याचा दावा खा.सुजय विखे पाटील यांनी केला. खोट्या सहानुभूतीला यापुर्वी  पारनेर तालुका फसला.आता पुन्हा ती चूक या तालुक्यातील जनता करणार नाही असा विश्वास व्यक्त करून या तालुक्यातील जनतेने आता विकास कामाची तुलना करण्याची गरज आहे.दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला.काम कमी आणि व्हिडीओच  जास्त आशी परिस्थिती तालुक्याची असल्याचा टोला लगावून पारनेर हा विचरांचा तालुका आहे. जनता सूज्ञ आहे.एकदा झालेली चूक पुन्हा होणार नाही असेही त्यांनी सांगितले. लोकसभेची निवडणूक देशाचे भवितव्य घडवविणारी आहे.तशीच पारनेर तालुक्याच्या भवितव्यासाठी महत्वपूर्ण आहे.या भागातील युवकांचे भविष्य आपल्याला घडवायचे आहे.समृध्द सुशिक्षित आणि सुरक्षित पारनेर करीता आपल्या सर्वाच्या सहकार्याने काम करायचे असल्याचे डॉ विखे पाटील म्हणाले.

Lok Sabha Election 2024 : ‘ते’ आपल्याला जमत नाही, विखेंचा लंकेंना टोला Read More »

Gudi Padwa 2024 : मोदींच्या नेतृत्वाखाली विजयाची गुढी उभारणार: खा. डॉ. सुजय विखे पाटील

Gudi Padwa 2024 : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विजयाची गुढी उभारणार असा विश्वास विद्यमान खासदार आणि दक्षिण अहमदनगर मतदार संघाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. पारिजात पार्क येथील गुढीपाडव्याच्या निमित्त आयोजित केलेल्या शोभा यात्रेत ते बोलत होते. देशाचा निकाल ठरला असून, नरेंद्र मोदीच हे पुन्हा देशाचे पंतप्रधान असतील असेही त्यांनी लोकांना संबोधित करताना सांगितले.  गुढीपाडव्याच्या निमित्त अहिल्यानगर येथील प्रोफेसर चौक ते पारिजात चौक येथे शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पांरपारिक वेशभूषेत सहभागी झालेल्या नागरिकांना विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी गुढीपाडवा आणि हिंदू नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी बोलताना सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, मागील १० वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिशा दिली असून, हा केवळ ट्रेलर आहे. पूर्ण पिक्चर अजून बाकी आहे. येणाऱ्या काळात मोदींच्या माध्यमातून भारत आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येईल. भारतातील जनतेने मोदींचे नेतृत्व स्वीकारले असून या निवडणुका केवळ औपचारिकता आहे. येत्या ४ जूनला ४०० पारचे ध्येय सहज गाठता येणार आहे. मोदींच्या माध्यमातून ५०० वर्षापासून रखडलेलल्या प्रभूरामचंद्राच्या मंदिराची निर्मिती झाली यामुळे देशात हिंदुत्वाला मोठे बळ आले आहे.  साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा गुढी पाडव्याचा सण हा अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मुहूर्त म्हणून मानला जातो. रामायण काळात गुढी पाडव्याच्या दिवशी रावणाच्या अत्याचारातून रामाने लोकांना मुक्त केले. तेव्हा तिथल्या लोकांनी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी घराघरात विजयाचा झेंडा फडकावला होता. त्याचप्रमाणे मोदींच्या नेतृत्वात देशातून भ्रष्टाचार, दडपशाही आणि हिंदू विरोधी शक्तींचे उच्चाटन होऊन देशात हिंदूत्वाचा पाया मजबूत होईल असा आत्मविश्वास डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. सुजय विखे यांनी आपल्या प्रचारातून लोकांचा संपर्क वाढविला आहे. यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत त्यांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

Gudi Padwa 2024 : मोदींच्या नेतृत्वाखाली विजयाची गुढी उभारणार: खा. डॉ. सुजय विखे पाटील Read More »

Nilesh Lanke News : त्यांनी जाणीवपूर्वक जिल्हा भकास ठेवण्याचे काम केले, लंके यांचा विखे कुटुंबावर हल्ला बोल

Nilesh Lanke News : गेली पन्नास,साठ वर्षे आमच्याकडे जिल्ह्याची सत्ता असल्याचे ते आपल्या भाषणातून सांगतात.या काळात त्यांनी केलेले असे एक काम दाखवावे की जे पंचवीस वर्षे जनतेच्या लक्षात राहिले आहे.त्यांच्याकडे मंत्रीपदे होती, आहेत.पण एकही मोठा प्रकल्प त्यांनी जिल्ह्यात आणला नाही.त्यांनी जाणीवपूर्वक संपूर्ण नगर जिल्हा भकास ठेवण्याचे काम केले.असा हल्लाबोल आमदार नीलेश लंके यांनी नाव न घेता विखे पिता पुत्रावर केला.  स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या सहाव्या दिवशी राहुरी तालुक्यातील विविध गावांमध्ये नागरीकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी आ. प्राजक्त तनपुरे, जि.प.चे मा. अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.  लंके म्हणाले, तुमच्या तालुक्याला खासदार धार्जिण नाही असे भाषणातून सांगण्यात येते. ज्यांनी तुम्हाला मदत केली नाही ते कृतघ्न असतील. परंतू नीलेश लंके हा माणूस असा आहे की एखाद्याने एकदा मदत केली तर मी त्याला आयुष्यभर विसरत नाही. त्याला शंभरवेळा मदत केल्याशिवाय मनाला चैन पडत नाही. आपल्या संकटात ज्यांनी मदत केली त्यांना मदत करण्याची भावना मनात असली पाहिजे.  विखेंना ज्यांनी मदत केली, त्यांनी त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला. नगर शहरात अनिलभैय्या राठोड यांनी त्यांना नगर शहर दाखविले. निवडणूकीनंतर त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, तुम्ही आम्ही कोण ?असा सवाल लंके यांनी  केला.    राजकारणात जिरवाजिरवी करण्यापेक्षा मी कामाला महत्व देणारा माणूस आहे.तुम्ही म्हणाल खरोखर माणूस भेटला आपल्याला. त्यांच्याकडे कामापेक्षा जिरवाजिरवीला जास्त महत्व असते. मागच्या निवडणूकीत त्यांनी मोठ मोठ्या गप्पा केल्या. सहा महिन्यानंतर प्राजक्त तनपुरे हे निवडणूकीला सामोरे जाणार आहेत. ते प्रचाराला गेल्यावर त्यांच्या कामाचा लेखाजोखा मांडून मते मागतील.  खासदारांनीही कामाचा लेखाजोखा मांंडणे अपेक्षीत असताना अपयश झाकून ठेवण्यासाठी डाळ आणि साखर वाटप करण्याची आयडीया त्यांनी शोधून काढल्याचे लंके म्हणाले.  नादी लावणारांना  घरी पाठविण्याची वेळ  पाण्याची बाटली २० रूपयांना मिळते. शेतकऱ्याचा जोड धंदा असलेल्या दुधाला २२,२३ रूपयांचा भाव मिळतो आहे. पालकमंत्री दुग्धविकास मंत्री आहेत ते दुधाला भाव का वाढून देत नाहीत ? ते म्हणाले, ५ रूपये अनुदान देऊ. कागद गोळा केले, शेतकऱ्यांना नादी लावले अनुदान मात्र मिळालेच नाही. हे लोक नादी लावणारे असून त्यांना आता घरी पाठविण्याची वेळ आली आहे.  रस्त्याचे काम सुरू करून दिले नाही तर नाव बदलेल नगर-पाथर्डी रस्त्यासाठी मी उपोषण केले ते उपोषणही मोडीत काढण्याचा प्रयत्न केला गेला. माझ्या उपोषणानंतर या रस्त्याचे काम मार्गी लागले. १३ तारीख होऊ द्या, नगर-मनमाड रस्त्याचे काम सुरू करून दिले नाही तर मी माझे नाव बदलून ठेवील. आभाळ फाटलंय, कोणतीच यंत्रणा शिवू शकणार नाही ! पूर्वी निवडणूकीच्या प्रचारासाठी एखादा नेता येणार असेल तर हातापाया पडून लोक जमा करावे लागत असत. इथे उलटे झाले आहे. दोन, दोन, तीन, तीन तास लोक वाट पाहत आहेत. जिल्हयात असे भासविले जाते की यंत्रणा, यंत्रणेचा याला फोन, त्याला फोन. कसली यंत्रणा ? यंत्रणा फिंत्रणा काही नाही ! आभाळ फाटल्यावर कोणीही रोखू शकत नाही. फाटलेले आभाळ शिवायला जगात कोणतीही यंत्रणा नाही असे लंके यांनी सांगितले.

Nilesh Lanke News : त्यांनी जाणीवपूर्वक जिल्हा भकास ठेवण्याचे काम केले, लंके यांचा विखे कुटुंबावर हल्ला बोल Read More »

Maharashtra News : विकास हेच माझे ध्येय : डॉ. सुजय विखे पाटील

Maharashtra News:  केवळ विकास हेच माझे ध्येय आहे आणि केवळ विकासासाठीच मी तुमच्याकडे मते मागणार आहे. असे प्रतिपादन भाजप आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. भाजपच्या वर्धापन दिनाच्या निमित्य आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मागील पाच वर्षात आपण केलेल्या विकास कामाच्या जोरावर आपण मतदारांसमोर जाणार असून केवळ विकासाचीच कामे लोकांना सांगा असा संदेश सुद्धा त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.  डॉ. सुजय विखे पाटील यांनी गावोगावी जाऊन लोकांच्या भेटीगाठी वाढविल्या आहेत. त्याच बरोबर मतदार संघातील बुथ कमीटीच्या माध्यमातून प्रचाराचे नियोजन बुथ कमीट्या सक्षमिकरण करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार जिल्ह्याच्या विविध ठिकाणी त्यांच्या सभा घेत प्रचाराची रणनिती कार्यकर्त्यांना समजावून सांगितली जात आहे.  भापजच्या ४४ व्या वर्धापन दिनानिमित्य आयोजित सात्रळ तालूका राहूरी येथील  कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. सुजय विखे यांनी केवळ विकास कामांची चर्चा करत उमेदवारांचा प्रचार करण्याचे सांगत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यात झालेल्या विकास कामे मतदारांपर्यंत पोहवा असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच विरोधकांवर चर्चा करून त्यांना महत्व देऊ नका, मागील पाच वर्षात जिल्ह्यात झालेली विकासकामे आणि पंतप्रधान  नरेंद्र मोदी  हेच आपल्या प्रचाराचा अजेंडा राहील त्या व्यतिरिक्त कोणत्याही भूलथापांना कार्यकर्त्यांनी बळी पडू नये.  तसेच सर्व स्थानिक हेवेहावे बाजूला ठेऊन ही निवडूक देशाची निवडूक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती पुन्हा देशाचे नेतृत्व देण्यासाठी काम करा असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Maharashtra News : विकास हेच माझे ध्येय : डॉ. सुजय विखे पाटील Read More »

Maharashtra Politics: रील वरून टीका करणाऱ्यांचा काळेंनी घेतला खरपूस समाचार; म्हणाले,गुंडाराजला पाठबळ देणारा…

Maharashtra Politics: महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके साधा माणूस आहेत. जसे स्व.अनिलभैय्या राठोड मोबाईल आमदार होते, तसे लंके या देशातील पहिले मोबाईल खासदार होतील. निलेश लंके रीलवर लोकप्रिय आहेत. कोविड काळात त्यांनी रियल मध्ये नुसते पारनेरच नाही तर नगर दक्षिणेसह महाराष्ट्रातून आलेल्या कोविड रुग्णांची सेवा केली. गोरगरिबांच्या अश्रू पुसण्याच काम केल.  रीलवर टीका करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की नगरकरांना गुंडाराजला पाठबळ देणारा नाही तर नगरकरांचा विकास करणारा खासदार दिल्लीला पाठवायचा आहे, असा टोला शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी लगावला आहे.  महाविकास आघाडीचे उमेदवार लंके यांच्या प्रचाराची रणनीती ठरवण्याच्या नियोजनाची शहर जिल्हा काँग्रेसची बैठक काळे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या शिवनेरी जनसंपर्क कार्यालयात पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी लंके यांच्यावर रिल वरून टीका करणाऱ्या शहराच्या आमदारांचे नाव न घेता त्यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला.  शेतकरी, व्यापारी, उद्योजक, तरुण, महिला अशा विविध घटकांचे सक्षमपणे प्रश्न मांडणारा खासदार लंके यांच्या रूपाने जनता निवडून देणार आहे. प्रभाग निहाय बैठकांचे आयोजन करून घरोघरी जात प्रचार करत शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली उमेदवाराला विजयी करण्यासाठी वज्रमूठ आवळून काम करण्याचे आवाहन यावेळी किरण काळे यांनी कार्यकर्त्यांना केले.  इंग्रजी वरून खिजवणाऱ्यांवर टीका  भाजप उमेदवार खा. सुजय विखे यांनी लंके यांना इंग्रजीतून बोलून दाखवावे, आपण निवडणुकीचा अर्जच भरणार नाही, असे वक्तव्य नगर शहरातील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केले होते. त्याचा समाचार घेताना काळे म्हणाले, तुम्ही कॉन्व्हेंट शाळेत शिकले. मोठ्या घरात जन्माला आले. तुमचा जन्म कारखानदार, सत्ता, मंत्रीपद असणाऱ्या घरात झाला. सोन्याचा आयता चमचा तुम्हाला जन्मापासून तुम्हाला तोंडात मिळाला आहे. पण आमचे लंके सामान्य कुटुंबातले आहेत.  वडील शिक्षक, आई शेतकरी असणाऱ्या गरिबाचं लेकरू आहे. काँग्रेस नेते तत्कालीन मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांचे देखील शिक्षण अल्प होतं. त्यांनाही इंग्रजी बोलता येत नव्हतं. मात्र त्यांनी विकासाच व्हिजन ठेवून महाराष्ट्राच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. विरोधी उमेदवारांना हे माहीत नाही असे दिसते की संसदेत मराठीतून देखील जनतेचे प्रश्न मांडता येतात. खा.ओमराजे निंबाळकर मराठीतच बोलतात. इंग्रजी वरून लंकेना खिजवण्याचं काम करणाऱ्यांना आता जनताच ईव्हीएमच्या माध्यमातून योग्य मतदान करत खिजवण्याच काम करेल, असा टोला काळे यांनी यावेळी लागला.  शेतकरी अडचणीत म्हणून बाजारपेठ डबघाईला  शेतकऱ्याला किमान आधारभूत किंमत देण्याचं आश्वासन देऊन देखील भाजप सरकारने पूर्ण केलं नाही. आज जगाचा पोशिंदा संकटात आहे. नगर दक्षिण देखील शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. शेतमालाला भाव नाही. शेतकऱ्याच्या खिशात पैसेच नाहीत. नगर शहराची बाजारपेठ ही शहरासह आसपासच्या तालुक्यांतील ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकरी ग्राहकांवर अवलंबून आहे. शेतकरीच अडचणीत असल्यामुळे बाजारपेठ देखील डबघाईला आली आहे. इन्कम टॅक्स कलम ४३ मध्ये दुरुस्ती करत ४५ दिवसांमध्ये व्यवहार पूर्ण करण्याची अट व्यापाऱ्यांना भाजप सरकारने घातली आहे. अन्यथा ते उत्पन्न म्हणून त्यावर कर लावण्याची तरतूद केली आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या वेळच्या निवडणुकीत व्यापारी देखील भरघोस मते देऊन त्यांचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी निलेश लंकेना विजयी करतील असा दावा यावेळी किरण काळेंनी केला.  प्रभाग निहाय बैठकांचे नियोजन  काळे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना प्रभाग निहाय बैठकांचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या. प्रभागातील प्रत्येक भागात, घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घ्या. त्यांना बूथ पर्यंत मतदानासाठी येण्या करिता प्रवृत्त करा. प्रत्येकाला मतदान करण्यासाठी जागृत करा. महाविकास आणि इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी समन्वय साधा. माजी मंत्री आ. थोरात यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरातून उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना यावेळी काळेंनी कार्यकर्त्यांना दिल्या.  ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेचा, माथाडी कामगार जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, ओबीसी शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, सांस्कृतिक विभागा शहर जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष चंद्रकांत उजागरे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष गौरव घोरपडे आदींनी मनोगत व्यक्त केले. महिला काँग्रेस, विद्यार्थी, युवक काँग्रेस, अल्पसंख्यांक, ओबीसी आघाडी, डॉक्टर, वकील सेल, सांस्कृतिक विभाग, कामगार आघाडी, साफसफाई कामगार विभाग, असंघटित व स्वयंरोजगार आघाडी यासह विविध फ्रंटल, सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शहराच्या सावेडी, केडगाव उपनगर भिंगार, मध्य शहरसह विविध भागातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

Maharashtra Politics: रील वरून टीका करणाऱ्यांचा काळेंनी घेतला खरपूस समाचार; म्हणाले,गुंडाराजला पाठबळ देणारा… Read More »

Nilesh Lanke: होय, मी गुंडच आहे पण … लंके यांनी दिला विखेंना उत्तर

Nilesh Lanke: होय, मी गुंडच आहे कारण जेव्हा गोर-गरीबावरती अन्याय होतो आणि ज्या वेळेस दहशतीचे, दादागिरीचे वातावरण निर्माण केले जाते त्यावेळेस आम्ही गुंड होण्याचा देखील पवित्रा घेतो असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी केले.  अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्या प्रचाराची रणधुमाळी उमेदवारी अर्ज भरण्याआधीच मोठ्या प्रमाणात चालू असून निलेश लंके यांनी मोहटा देवी गडावरून जनसंवाद यात्रेचा नारळ फोडून स्वाभिमानी जनसंवाद यात्रेचा शुभारंभ शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते करून गावागावात जाऊन जनसामान्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत.  महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी नगर शहरामध्ये कार्यकर्ता मेळाव्यात लंके यांना एक आव्हान केले आहे.  निलेश लंके यांनी एक महिन्याभरात इंग्रजीत भाषण पाठ करून दाखवावे मी उमेदवारी अर्ज सुद्धा भरणार नाही अशा प्रकारचे वक्तव्य केल्याने आमदार निलेश लंके यांनी देखील त्यांना पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तर दिले आहे.   संसदेत कुठल्या भाषेमध्ये प्रश्न मांडायचा यापेक्षा संसदेत तुम्ही किती प्रभावीपणे प्रश्न मांडू शकतात हे महत्त्वाचे असून चौका चौकात इंग्रजीत भाषण मी जर करत बसलो तर त्याचा फायदा काय आहे. सर्वसामान्यांना काम पाहिजे भाषण नाही असे निलेश लंके म्हणाले.

Nilesh Lanke: होय, मी गुंडच आहे पण … लंके यांनी दिला विखेंना उत्तर Read More »

Nilesh Lanke: मुकुंदनगर येथे आमदार निलेश लंके यांची इफ्तार पार्टीला हजेरी

Nilesh Lanke :  गेल्या 20 दिवसांपासून मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिना आहे.  याच पार्श्वभूमीवर रविवारी आमदार निलेश लंके यांनी मुस्लिम बांधवांसमवेत इफ्तार केला.  रविवार सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मुस्लिम बांधवांसमवेत पवित्र रमजानचा उपास सोडविण्यात आमदार लंकेंनी हजेरी लावली. यावेळी मज्जू भाई फ्रेंड सर्कल व उम्मीद फाउंडेशनच्या वतीने  इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार निलेश लंके यांचा या इफ्तार पार्टी दरम्यान सत्कार देखील करण्यात आला तर अनेक मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली.  यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे, अलफेज खान, रियाज शेख, शाहरुख  शेख, मुजाहिद बंदेअली, सलमान मणियार, वाहिद सय्यद, फैजअली शेख, संदेश पाटोळे, अरबाज शेख, अमन शेख, मोहिद खान आदी उपस्थित होते.

Nilesh Lanke: मुकुंदनगर येथे आमदार निलेश लंके यांची इफ्तार पार्टीला हजेरी Read More »

Nilesh Lanke : “साहेबांचा आदेश मी सदैव मानेन” अजित पवारांना धक्का देत निलेश लंके शरद पवार गटात  

Nilesh Lanke : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना धक्का देत गुरुवारी शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे. यानंतर लंके म्हणाले, आता आपण साहेबांच्या (शरद पवार) आदेशाचे पालन करणार आहोत.   नीलेश लंके म्हणाले, “मी नेहमीच शरद पवारांच्या विचारसरणीचे पालन केले आहे. 2019 मध्ये माझा निवडणूक प्रचार त्यांनीच सुरू केला होता. त्यांची विचारधारा आणि पक्ष मी कधीही सोडला नाही.” राष्ट्रवादी काँग्रेस (पुणे) शहर कार्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत लंके म्हणाले, लोकसभा निवडणुकीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. मात्र, मी साहेबांच्या (शरद पवार) आदेशाचे पालन करेन, असे ते म्हणाले.   शरद पवार म्हणाले, “लंके हे कष्टाळू आहेत आणि त्यामुळेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाची पसंती होती. त्यांनी अलीकडेच काही निर्णय घेतले असतील, पण ते त्यांच्या मतदारांप्रती प्रामाणिक आहेत आणि पुढेही राहतील. जनतेसाठी काम करण्यासाठी. त्यांना काही मदत लागली तर आम्ही त्यांना जनहितासाठी मार्गदर्शन करू.” आदल्या दिवशी अजित पवार म्हणाले होते की, लंके यांनी पक्ष सोडण्यापूर्वी आपल्या निर्णयाचा विचार करावा. लंके यांनी पक्ष सोडल्यास त्यांना अपात्रतेला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात लंके निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. लंके हे राष्ट्रवादीचे (एसपी) लोकसभेचे उमेदवार असतील, असे संकेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले. ते म्हणाले, “लंके हे अहमदनगरमधील लोकप्रिय नेते आहेत. कोविड महामारीच्या काळात केलेल्या कामामुळे ते शेजारच्या जिल्ह्यातही प्रसिद्ध आहेत.  शरद पवार यांच्या विचारधारेवर त्यांचा नेहमीच विश्वास होता आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मागील विधानसभा निवडणूकही लढवली होती. ते शरद पवार साहेबांचा फोटो  वापरत राहतील आणि आता औपचारिकपणे NCP (SP) चा भाग आहेत.

Nilesh Lanke : “साहेबांचा आदेश मी सदैव मानेन” अजित पवारांना धक्का देत निलेश लंके शरद पवार गटात   Read More »

Loksabha Election 2024 : निलेश लंके लोकसभेची तुतारी फुंकणार… तनपुरे यांनी सांगूनच टाकलं

Loksabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये नगर दक्षिण लोकसभा जागेवर अजित पवार गटात असलेले आमदार निलेश लंके शरद पवार गटाकडून लोकसभा लढवणार का याबाबत तर्क वितर्क लावले जात असतानाच यावर आमदार प्राजक तनपुरे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.  अनेक लोक हातातील घड्याळ काढून तुतारी वाजविण्यास सज्ज असतील असा आम्हाला आशा आहे असा विश्वास यावेळी आमदार तनपुरे यांनी व्यक्त केला. निलेश लंके देखील लवकरच शरद पवार गटात येतं लोकसभा निवडणूक लढवतील असा विश्वास यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना आमदार तनपुरे म्हणाले की, लोकसभेसाठी माझं नाव चर्चेत नसून मी स्वतः लोकसभा लढवणार नाही मी विधानसभा लढवणार आहे असं तनपुरे यांनी स्पष्ट केलं तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, लंके यांनी घेतलेल्या महानाट्य मोठा जनप्रतिसाद मिळाला.  तसेच येणाऱ्या काळामध्ये अनेक लोक हातातली घड्याळ काढून तुतारी फंकण्यास सज्ज राहतील अशी आशा आम्हाला आहे.  लंकेचा पक्षप्रवेश होणार काय यावरती बोलताना ते म्हणाले की लंके का येणार नाही असे म्हणतच एक प्रकारे लंकेंचा लवकरच पक्ष प्रवेश होणार असं असं सुचक विधान यावेळी तनपुरे यांनी केलं.  महाविकास आघाडीकडून नगर दक्षिणेसाठी अगदी तोला मोलाचा उमेदवार दिला जाईल  याबाबत कुठलेही शंका नाही असं देखील यावेळी बोलताना प्राजक्ता तनपुरे यांनी स्पष्ट केले.

Loksabha Election 2024 : निलेश लंके लोकसभेची तुतारी फुंकणार… तनपुरे यांनी सांगूनच टाकलं Read More »