DNA मराठी

Nilesh Lanke

Loksabha Election : महाराष्ट्र दिल्ली पुढं कधी झुकणार नाही – अमोल कोल्हे

Loksabha Election :  2024 ची लोकसभा निवडणूक ही प्रतिष्ठेची असेल सर्वसामान्य माणसांच्या स्वाभिमानाचे असेल त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही सर्वसामान्य जनता मतदानातून उत्तर देईन, महाराष्ट्र दिल्ली पुढे कधीही झुकला नाही आणि झुकणारही नाही. असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार अमोल कोल्हे यांनी सत्ताधारी महायुतीला दिला आहे.   अजित पवार यांनी शिरूरमध्ये अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली होती यावर बोलताना अमोल कोल्हे म्हणाले एवढ्या मोठ्या नेत्यावर मी काय बोलणार मला तीन वेळेस सांसद रत्न पुरस्कार मिळाला आहे. ज्या पद्धतीने शिरूर मतदार संघामध्ये काम सुरू आहे त्यामुळे हे काम बोलेल त्यामुळे दादांच्या टिकेवर भाष्य करणे मला उचित वाटत नाही त्यांच्या टीकेला उत्तर द्यायला मी बांधील नाही मी आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो त्यामुळे पवार साहेब बोलतील त्या गोष्टीला मी बांधील. याच बरोबर आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडी महायुतीपेक्षा जास्त लोकसभा जागांवर विजय प्राप्त करणारा असा विश्वास देखील त्यांनी DNA मराठीशी बोलताना व्यक्त केला.

Loksabha Election : महाराष्ट्र दिल्ली पुढं कधी झुकणार नाही – अमोल कोल्हे Read More »

Nilesh Lanke : जलजीवन योजनेत घोटाळा…लंकेकडून कारवाईची मागणी; अनेक चर्चांना उधाण

Nilesh Lanke : – अहमदनगर जिल्ह्यात जलजीवन मिशन अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या पाणी योजनांच्या निविदा प्रक्रियेत मुख्य कार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता यांनी संगनमताने घोटाळा केल्याचा आरोप विधानसभेत आमदार नीलेश लंके यांनी केला आहे.  यामुळे जिल्ह्यात अनेक चर्चांना उधाण आला आहे. या प्रकरणात कारवाईची मागणी देखील त्यांनी विधानसभेमध्ये केली आहे.   विधानसभेत लंके म्हणाले, ठेकेदारास काम देण्यासाठी गैरमार्गाचा अनेकदा अवलंब करण्यात आला आहे. खोटी कागदपत्रे जोडणे, ठेका मिळाल्यानंतर काम पुर्ण नसणे, कॅपॅसिटीपेक्षा कोटींची जास्त कामे देण्यात आली.  एका ठेकेदारास सुरूवातील अपात्र ठरविणे व त्याच ठेेकेदाराला लगेच दोन दिवसांत पात्र ठरविण्यात आले आहे. टेेंडर रद्द करून पुन्हा करणे, टेेंडर नोटीसमधील अटी बदलणे अशा गैरमार्गाचा अवलंब केल्याच्या तक्रारी कार्यकारी अभियंता यांच्याकडे करूनही काहीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचे लंके यांनी नमुद केले.   जल जीवन कार्यक्रमांतर्गत पारनेर-नगर मतदारसंघातील मौजे जामगांवसह सहा गावांची पाणी पुरवठा योजनेचे काम घेताना ठेकेदारांनी खोटी व बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केली आहे. ठेकेदाराकडे कोणतीही कागदपत्रे नसताना काम देण्यात आले आहे. या ठेकेदाराने काम पुर्ण झाल्याचे दाखलेही खोटे सादर केले असून त्यावर संबंधित विभागाच्या जावक क्रमांकाचा उल्लेख नाही तसेच सही देखील बनावट आहे. शासन निर्णयाप्रमाणे प्रक्रिया राबविण्यात आलेली नसल्याचे लंके यांनी सांगितले.   ठेका घेतलेली सर्व कामे 25 ते 30 टक्के पुर्ण आहेत. टेंडर प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या व्यक्ती, संस्था यांच्याविषयी नगर जिल्हयातील लोकप्रतिनिधीनींनी जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे पुराव्यासह वारंवार तक्रारी करण्यात येऊनही चौकशी करण्यात येत नाही.  ठेकेदारासबंधी माहीती मागविल्यानंतर माहीती देण्यात येत नाही. बनावट कागदपत्रे सादर करून ठेकेदाराने कामे मिळविली आहेत. या ठेकेदारांवर कारवाई झाली पाहिजे अशी आग्रही मागणी आ. लंके यांनी यावेळी बोलताना केली.

Nilesh Lanke : जलजीवन योजनेत घोटाळा…लंकेकडून कारवाईची मागणी; अनेक चर्चांना उधाण Read More »