Nilesh Lanke : गेल्या 20 दिवसांपासून मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिना आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी आमदार निलेश लंके यांनी मुस्लिम बांधवांसमवेत इफ्तार केला.
रविवार सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मुस्लिम बांधवांसमवेत पवित्र रमजानचा उपास सोडविण्यात आमदार लंकेंनी हजेरी लावली.
यावेळी मज्जू भाई फ्रेंड सर्कल व उम्मीद फाउंडेशनच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार निलेश लंके यांचा या इफ्तार पार्टी दरम्यान सत्कार देखील करण्यात आला तर अनेक मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली.
यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे, अलफेज खान, रियाज शेख, शाहरुख शेख, मुजाहिद बंदेअली, सलमान मणियार, वाहिद सय्यद, फैजअली शेख, संदेश पाटोळे, अरबाज शेख, अमन शेख, मोहिद खान आदी उपस्थित होते.